पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्रीय व्यापारी परिषद् २३५ भरविण्याचे ठरले असून, त्या कार्याकरितां कार्यकारी मंडळहि निवडलें गेलें आहे. मुंबईचा व्यापार कितीहि मोठा असला तरी त्यांत महाराष्ट्रीय व्यापाऱ्यांचा भाग अत्यल्प आहे आणि महाराष्ट्रीय व्यापायांची संख्याहि तितकीच छोटी आहे. ज्या डेक्कन मर्चेंट्स ॲसोशिएशनच्या विद्यमानें ही परिषद भरविली जाणार आहे त्या संस्थेच्या सभासदांची संख्या अवघी १२५ आहे ! तथापि कांही वर्षांपूर्वी जेथें हाताच्या बोटावर मोजण्याइतकीहि दक्षिणी व्यापारी मंडळी नव्हती तेथें एवढी संख्या देखील निराशाजनक मानण्याचे कारण नाही आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार अशीं सुचिन्हें दिसत आहेत. येत्या नोव्हेंबरांत जी 'महाराष्ट्रीय व्यापारी परिषद' भरविण्यांत येणार आहे तिचीहि या सुचिन्हांतचं गणना केली पाहिजे. C मुंबईतील दक्षिणी समाजांतील व्यापारविषयक प्रवृत्ति वाढवून त्या समा- जाच्या बुद्धिमत्तेचा ओघ उद्योगधंद्याकडे वळविण्याच्या हेतूने तेथें १९१४ साली जी ‘ डेक्कन मर्चेंट्स ॲसोशिएशन ' स्थापन झाली तिनें गेल्या आठ वर्षात बरीच कामगिरी केली आहे. उद्योगधंद्यांची माहिती सुलभपणें होण्याकरितां १९१६ सालीं औद्योगिक वाचनालय उघडण्यांत आले, आणि कै. लोकमान्यांच्या निधनानंतर त्यांचें स्मारक म्हणून त्या वानालयाला 'लो. टिळक टेक्निकल लायब्ररी ' ची जोड देण्यांत आली. त्याचप्रमाणे या संस्थेनें सुप्रसिद्ध तज्ज्ञांकडून व्यापारासंबंधी व्याव- हारिक विषयांवर व्याख्यानें करवून नवीन पिढींत व्यापाराची अभिरुचि उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय २५ हजार रुपयांचे शेअर्स काढून 'डेक्कन मर्च- ट्स् को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी 'हि स्थापिली, आणि आतां तिचें भांडवल एक लक्षापर्यंत वाढवून तिला लवकरच बँकेचे स्वरूप देण्यांत येणार आहे.. संस्थेने आतांपर्यंत जें कार्य केले त्या योगानें संस्थेस स्थैर्य व धैर्य येऊन या पुढे महाराष्ट्रांत उद्योगधंद्यांची प्रगति करणे, उत्पादक धंदे हाती घेण्यात येणाऱ्या अडचणींचा परिहार करण्याची साधनें निर्माण करणे, जिल्हानिहाय व्यापारी संघ स्थापून व्यापारविषयक माहिती एकत्र करणे, कारखानदार व व्यापारी यांची जंत्री तयार करणे, व्यापारी वाङ्मय निर्माण करणें, होतकरू कारखानदाराला धंदेविषयक सल्ला देणें, दक्षिणी व्यापाऱ्यांतील वादग्रस्त प्रश्नांचा पंचामार्फत निकाल लावण्याची सोय निर्माण करणे इत्यादि अनेक महत्त्वाची कामें अंगावर घ्यावयाची आहेत; व तत्पूर्वी विचारविनिमय व्हावा हेतूनेंच द्दी व्यापारी परि- षद भरविण्यांत येत आहे असे दिसतें. ●विचारविनिमय करणे आवश्यक या परिषदेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधि यांची योजना करण्याचें जें कार्यकारी मंडळाने ठरविलें आहे ते अगदी योग्य आहे.