पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३४ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध बाढू लागली. १९१३ पासूनच्या महागाईची शेंकडेवारी सरकारी पत्रकांत दिली नसल्याने वरील कोष्टकांत नमूद केली नाहीं; परंतु ही किती वाढली आहे याची प्रत्येकास जाणीव आहेच. ही महागाई कमी होण्याकरितां सरकारनें परदेशांतून येणाऱ्या सोन्या- चांदीच्या आयातीवरील निर्बंध काढून टाकला पाहिजे. टांकसाळींतून खासगी व्यक्तीसहि सोने किंवा चांदी दिल्यास सोन्याचांदीचें नाणें मिळण्याची सोय केली पाहिजे. स्वतः सरकारनें सोनेंचांदी खरेदी करून नाणें तूर्त पाडूं नये; आणि मुख्यतः नोटांचा प्रसार कमी होण्याकरितां नव्या नोटा काढण्याचें बंद ठेवून कोणत्याहि ट्रेझरीमधून नोटांच्या मोबदला चांदीचें किंवा सोन्याचें नाणें देण्याची बिनहरकत तजवीज करावी, त्याचप्रमाणे चांदीचें किंवा सोन्याचें नाणें आटविणें गुन्हां मानूं नये. अशी तजवीज न होईल तर ही महागाई अशीच वाढत जाईल आणि त्या योगानें ठराविक पगारवाल्या लोकांचें व मजुरांचें नुकसान होऊन पगार वाढविण्याकरितां हल्ली मुंबईच्या गिरण्यांतून जसे संप चालू आहेत तसे संप ठिकठिकाणी होतील. महाराष्ट्रीय व्यापारी परिषद् [ मुंबईत डेक्कन मर्चेंट्स ॲसोसिएशनमार्फत पहिली महाराष्ट्रीय व्यापारी परिषद श्री. बाळासाहेब पंतप्रतिनिधि, संस्थान औंध, यांच्या अध्यक्षतेखालीं भरविण्याचें ठरलें. ती परिषद भरण्यापूर्वीच हा लेख लिहिलेला असून, महा- राष्ट्रीयांचें पाऊल व्यापारांत पुढें पडण्याला आणि तेथें तें स्थिर होण्याला काय काय योजना केल्या जाव्या याविषयीं अनेक उपयुक्त व विधायक सूचना या लेखांत केल्या आहेत. ] अर्थरर्थाः प्रबध्यन्ते गजाः प्रतिगजैरिव । - कौटिलीय अर्थशास्त्र - डेक्कन मर्चेंट्स ॲसोसिएशनची कामगिरी आठ वर्षांपूर्वी मुंबईस स्थापन झालेल्या 'डेक्कन मर्चेंट्स ॲसोसिएशन ' मार्फत येत्या नोव्हेंबरच्या ११ ते १३ तारखांस मुंबापुरीत 'महाराष्ट्रीय व्यापारी परिषद' ( केसरी, दि. १७ ऑक्टोबर १९२२ )