पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध अशीच वाढत जाईल. केवळ महायुद्धामुळे महर्घता वाढली नसून ती वाढण्याला कारण नोटांचा सुळसुळाट होय हा सिद्धान्त कराचीचे मि. मॅकनेनी यांनी आपल्या ‘High Prices’ या पुस्तकांत सप्रमाण गणितशास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केला आहे. देवघेवीचा व्यवहार वाढला तर वाढला नोटा किंवा नाणें यांची गरज भासूं लागते व तेवढ्या प्रमाणांत सालोसाल नोटांत किंवा नाण्यांत भर पडत गेली तरी तिचा बाजारभावावर परिणाम होण्याचे फारण नसतें. परंतु देवघेव किंवा व्यवहार पूर्वी- इतकाच राहून बाजारांत नाण्यांचा किंवा नोटांचा सुळसुळाट झाला आणि तें नाणें किंवा नोटा कमी करण्याला कायदेशीर मार्ग नसला म्हणजे महागाई आपोआप वाढलीच पाहिजे. १८९३ सालापर्यंत टांकसाळीतून केव्हांहि चांदीचे रुपये पाडून घेतां येत असल्यामुळे आणि घरी रुपये आटवून चांदी करतां येत असल्यामुळे नाण्यांची वाढ बेसुमार होऊं शकतच नव्हती. कारण तशी वाढ झाली की, लोकांनी रुपये आढवून नाणें कमी केलेच. परंतु ज्या दिवसापासून रुपयाची नैस- र्गिक किंमत नाहींशी होऊन त्याला कृत्रिम किंमत आली त्या दिवसापासून दा स्वाभाविक मार्ग नाहींसा झाला आणि कृत्रिम रुपयांची भर पडतां पडतां बाजारांतलें नाणं इतकं फुगत चाललें की महागाई असह्य वाटू लागली, आणि नवीन नाणें पाडणें बंद ठेवावे लागले. नोटांच्या बाबतींत महायुद्धापूर्वीपर्यंत एक उत्तम निर्बंध अमलांत होता. तो असा की, चलनी नोटांची संख्या कितीहि वाढो त्यांतून १४ कोटींच्या नोटांखेरीज इतर नोटांच्या मोबदला रोकड शिल्लक खजि- न्यांत पडून राहत असे. अर्थातच नोटांची वाढ कितीहि कोटींची झाली तरी त्यांच्याऐवजी तितकें नाणे किंवा चांदी परत खजिन्यांत जाई व त्यामुळे बाजारां- तील एकंदर चलन वाढत नसे व त्यामुळे महागाईत भर पडत नसे. परंतु महा- युद्धाच्या निमित्ताने सरकारनें तोहि निर्बंध काढून टाकला आणि बाजारांतील चलनांवर नोटांचा आणि नाण्यांचा असा दुहेरी मारा सुरू झाला; तेव्हां इतर सर्वच पदार्थाच्या किंमती वाढू लागल्या यांत आश्चर्य तें काय ? १८९३ सालापासून नोटांच्या व कृत्रिम रुपयांच्या वाढीमुळे बाजारांतील चलन केव्हां, किती, कसे वाढले व त्याचा बाजारभावावर परिणाम होऊन महर्गता कशी वाढली हे समजण्याकरितां पुढील कोष्टक पाहा :- आंकडे लक्ष रुपयांचे आहेत चांदीचें चलन सन १८९२ १८९३ १२००० ११४०० बिनमोबदला नोटा ८०० ८०० महागाईची शेंकडेवारी १०० ९६