पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नोटांचा सुकाळ आणि महर्घता २३१ आली असून खुद्द मुंबई शहरांतहि करन्सी ऑफिसांतून नोटांचा मोबदला रुपये मिळण्याची पंचाईत पडूं लागली आहे; आणि नोटांची पुडकीं घेऊन नाणें माग- णाऱ्यांची करन्सी ऑफिसांत इतकी गर्दी होत आहे की, तेथें बंदोबस्ताकरितां स्पेशल पोलीस पार्टी ठेवावी लागत आहे. मुंबई शहरांतच अशी स्थिति झाल्यावर इतरत्र कथा काय सांगावयास नकोच. सरकारी ट्रेझरींतून, पोस्टांतून, बँकेच्या शाखांतून जेथें सरकारला बटवडा करण्याचें कारण पडतें तेथें तेथें नोटांच्या बंडलाचाच भरणा दिसतो. नाणें मागितलें तरी मिळेनासे झाले आहे. ज्या वेळी प्रथम अडीच रुपये व एक रुपया किंमतीच्या नोटा सुरू करण्यांत आल्या त्या वेळीं सदर : नोटांच्या मोबदला रोकड नाणें कोणत्याहि ट्रेझरींतून मिळेल आणि पोस्ट-ऑफिसांतूनहि एका इसमास एका दिवशीं पांच रुपयांपर्यंत रोकड मिळ- ण्याची तजवीज करण्यांत येईल असे सरकारने जाहीर केलें, आणि त्या आश्वा सनावरून त्या वेळी नोटांचा प्रसार बिनहरकत सुरू झाला. परंतु आतां तें वचन बाजूसच राहून मुंबईच्या करन्सी ऑफिसखेरीज इतरत्र बहुतेक कोठेंहि नोटा देऊन हक्कानें नाणे मागतां येईनासे झाले आहे; आणि त्यामुळे लहान लहान पगारवाल्यांना व पेन्शनरांना नोटा मोडविण्याकरतां भूर्दंड भरावा लागत आहे. अशा रीतीने अनेकांचें विनाकारण नुकसान होत असून शिवाय सरकारने अशा जबरीनें नोटांचा प्रसार वाढविण्याचा यत्न केल्यानें महर्घतेंतहि भर पडत आहे. म्हणजे सरकार नोटांचा जसजसा प्रसार जारीने करूं लागेल तसतसे लोकांचें बट्ट्याच्या पायीं आणि वाढत्या महागाईमुळे असे दुहेरी नुकसान होत आहे. नोटांची वाढ बेसुमार होऊन रोकड नाण्याची टंचाई भासूं लागल्यास नोटा मोडविण्याकरितां बट्टा द्यावा लागल्यानें, ज्यांना आपला सगळाच पगार नोटांच्या रूपानेच मिळतो, रोकड मुळींच मिळत नाहीं, त्यांचे नुकसान होतें ही गोष्ट सहज समजण्यासारखी आहे. परंतु त्याबरोबरच इकडे महागाई कशी वाढते तें तितक्या सुलभपणें समजण्या- सारखे नसल्याने त्याचा थोडासा खुलासा करण्याचें योजिले आहे. कृत्रिम नाणे फुगलें कीं महर्चता वाढते हिंदुस्थानांत महागाई कां वाहूं लागली याची मीमांसा करण्याकरितां सात वर्षांपूर्वी सरकारने एक बंगाली अधिकारी नेमले होते. त्यांनी आंकड्यांचें पुष्कळसें गौडबंगाल करून नाण्यांची व नोटांची वाढ यांचा वाढत्या महागाईशी संबंध नाहीं असें सिद्ध करण्यासाठी पुष्कळ धडपड केली. परंतु हा संबंध इतका उघड उघड व नैसर्गिक आहे की, तो असले दहा रिपोर्ट लिहिले तरी नाहींसा होणे शक्य नाहीं. महायुद्धास सुरुवात झाल्यानंतर प्रथम दोन वर्षेपावेतों महागाई कांहीं विशेष वाढली नाहीं; परंतु त्यानंतर महागाईची कमान जी चढू लागली ती कांही विलक्षणच. आणि अद्यापिछि सरकार जर नोटांचा जादा प्रसार करूं लागेल तर ती महागाई