पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३० श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध कोटीचें अधिक उत्पन्न अविछिन्न येईल; म्हणजे तीन कोटींची पडणारी तूट भरून निघून थोडीशी बचतच राहील. याखेरीज वाढल्या कर्जाचे वाढते व्याज भागविण्या- करितां मोटारी, सायकली वगैरे चैनीचे जिन्नस आणि रंग, रासायनिक द्रव्ये, पेटंट औषधें वगैरेवरील करहि जरूर तर पांच टक्कयाने वाढवावा. अशा रीतीनें खर्चात काटकसर करून योग्य मालावर वाढता कर बसविल्यास गोरगरिबांच्या मिठावर कर लादावयास नको, आणि हलक्यासलक्या उत्पन्नावरील प्राप्तीच्या कराचा बोजाहि वाढवावयास नको. यापेक्षा अधिक उत्पन्नाची जरूरी वाटल्यास प्रातीच्या करांत सालीना ६ हजारांहून ज्यांचे उत्पन्न अधिक आहे त्यांच्यावर हह्रीं दररुपयामागें ५ पै कर आहे तो ६ पै करण्यांत यावा, म्हणजे जमाखर्चीत तूट न येतां उलट थोडीशी शिल्लकच राहील. एतावता कर वाढवावयाचेच अस- तील तर हे कर वाढवा. हे न वाढवितां भलतेच दुसरे कर वाढविणें हें अत्यंत गैर- मुत्सद्देगिरीचें होईल. याउपर फडणवीस सर वुइल्यम् हे काय करतात तें पाहूं. नोटांचा सुकाळ आणि महघेता [ या लेखांतल्या विषयाची कल्पना मथळ्यावरूनच येण्यासारखी आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळांत चलनी नोटांची वाढ बेसुमार झाली. त्या वेळी नोटा बदलून चांदीचे रुपये मिळणें दुर्लभ झाले व त्याचा परिणाम बाजारावर होऊन महर्घता वाढत चालली. महायुद्धामुळे महर्वता वाढली हें सरकारचें मत कांही अंशानें खरें असले तरी महायुद्ध संपल्यानंतरहि नोटांची भरच पडत चालल्यामुळे विनाकारण महागाई वाढत आहे, यास्तव सरकारनें नोटांची नवी भर घालणे थांबवावें असें या लेखांत प्रतिपादिले असून, नोटांची वाढ व महर्घतेची वाढ यांचा परस्परसंबंध १८९२ सालापासूनचे आंकडे घेऊन सिद्ध केला आहे.] नोटा मोडविणें दुरापास्त झाले अलीकडे बाजारांत नोटांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्या मोबदला रोकड नाणें मिळत नाहीं; किंवा नाणे मिळण्याकरितां बराच बट्टा द्यावा लागतो व त्यामुळे गि-हाइकांचें नुकसान होते अशी ओरड सुरू झाली आहे. कांही दिवसां- पूर्वी ही तक्रार मध्यप्रांतांत विशेष होती; परंतु तेथें रोकड मिळण्याची सरकारने तजवीज केल्याने ती तक्रार कमी झाली. आतां ही आपत्ति मुंबई इलाख्यावर ( केसरी, दि. १४ जानेवारी १९१९ )