पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर वाढवावयाचेच तर हे वाढवा २२९ सारख्या अवांतर कामाची तरतूद कर्जातूनः करावयाची हें तत्त्व मान्य आहे; परंतु चालू खर्चालाच तूट पडूं लागल्यास मग तरी कर वाढविणें जरूर आहे की नाहीं ! याला उत्तर एवढेच की, चालू खर्च जर सर्वच अपरिहार्य असेल तर त्याची तोंड- मिळवणी कर वाढवूनच केली पाहिजे. हा खर्च अपरिहार्य नाहीं, याकरितां एखादें कमिशन बसवून खर्चाच्या वाढीची चौकशी करा, असा कै. ना. गोखले यांनी किती तरी वेळां आग्रह धरला होता, तथापि तो सफळ झाला नाही. आतां खर्चाची अडचणच पडली तेव्हां स्वतः फडणवीसच काटकसर करण्याची खटपट करीत आहेत; परंतु जोपर्यंत लम्कर, सिव्हिल सर्व्हिस, पोलीस व स्टेट सेक्रेटरीचें ऑफिस या चार जांवईखात्यांना हात लावावयाचा नाही तोपर्यंत काटकसर होणार कशी ? बड्या बड्या पगारांच्या युरोपिअनांच्या जागा एकट्या लॉर्ड कर्झन यांनींच जेवढ्या वाढविल्या तेवढ्या जरी कमी केल्या तरी तूट येण्याच्याऐवजी किती तरी शिल्लक उरेल; पण ते व्हावें कसें ? असो. तितका खर्च जरी कमी झाला नाहीं तरी १९१३-१४ साली जितका नक्की खर्च झाला तितकीच मर्यादा कायम राहिली, त्तरी चालू साल संपल्यानंतर जी कांही थोडकीशी व्यापाराची वाढ होऊं लागेल, तिच्या योगानें रेल्वेचें व जकातींचें उत्पन्न आणखी वाढून ही तूट भरून येईल. तात्पर्य, काटकसरीचें धोरण आणि सर वुइल्यम् मेयर यांचा जमेच्या वाढीविषयींचा आशाबादीपणा, या दोन गोष्टी लक्षांत घेतां चालू जमाखर्चात गतसालाइतकी म्हणजे पांच कोटींची तूट न येतां ती फार तर ३ कोटींची येईल. जकातवाढीच्या सूचना तेबढी तरी का होईना पण तूट आलीच तर ती भरून काढण्याकरितां कर चाढावलाच पाहिजेना ? असा सवाल पुढे येणारच. अर्थात् दुसरा कांहीं काटकसरीचा मार्ग स्वीकारावयाचा नसेल तर कर वाढविणें प्राप्त आहे; पण तो वाढवावयाचाच असेल तर भलताच तरी वाढवूं नका, ज्याला सर्व हिंदी लोकांची संमति मिळेल तोच चाडवा, एवढेच आमचें सांगणे आहे. असे कर वाढविण्याला जागा कोणती आहे व त्यांतून तीन कोटींची तूट कशी भरून निघेल ते पाहूं. युद्धाच्या वेळी ज्या जिनसांची निर्गत वाढली ते जिन्नस परराष्ट्रांना अत्यंत आवश्यक व बऱ्याच प्रमाणानें केवळ हिंदुस्थानांतूनच पुरविले जातात हें स्पष्ट आहे. असे जिन्नस म्हणजे तागाचें कापड, चहा, हाडे, कातडी हे होत. युद्धामुळे इतर सर्व जिनसांची निर्गत बसली पण यांची निर्गत वाढली. तस्मात् या पदार्थांच्या निर्गतीवर पांच टक्के जकात बसविल्यास तागाच्या कापडाबरील जकातीचें उत्पन्नच दीड कोटि, चहाच्या जकातीचें उत्पन्न पाऊण कोटि आणि हातकातड्यावरील जकात अर्धा कोटि मिळून तीन कोटि रुपयांची तूट भरून निघेल. यानंतर आयात मालावरील जकातींत साखरेवर जकात हल्ली पांच टक्के आहे ती वाढवून दहा टक्के केल्यास निदान अर्ध्या