पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ महायुद्ध समाप्त झाल्यामुळे ग्रेटब्रिटनची नजर फिरली आणि स्वराज्याचे हक्क वाढविण्याऐवजी ते संकोचित करून दडपशाहीनें चळवळ दडपण्याचा उपद्याप सुरू झाला. त्या वेळीं ब्रिटिश मुत्सद्दयांना दडपशाही गर्हणीय बाटत असली, तरी स्थानिक अधिकाऱ्यांच्या कारवाईपुढें वरिष्ठांचें तत्त्वज्ञान कसें लंगडें पडतें हैं दाख- विण्याकरितां 'मोर्ले साहेबांच्या आठवणी' हा पांचवा लेख दिला आहे. मध्यंतरी जालियनवाला बागेतील कत्तलीचें घोर प्रकरण झाले. त्याची ब्रिटिश मुत्सद्दयांना शरम वाटून ' झालें गेलें तें विसरून जा' असा साळसूदपणाचा उपदेश करण्यासाठीं बादशाहांचे काका हिंदुस्थानांत आले. त्यांची 'संजय शिष्टाई कशी निष्फळ झाली हें सातव्या लेखांत वर्णिले आहे. पण हे काकासाहेब विलाय- तेला परत जाण्याला निघण्यापूर्वीच मद्रास इलाख्यांत पुनश्च दडपेगिरीला प्रारंभ झाला, त्या दडपशाहीला उद्देशन 'प्रायश्चित्ताच्या वेळींच नवें पाप' असा लेख लिहिला आहे. . मुंबईच्या दंग्यापासून बोध घ्या हा आठवा लेख असहकारितेच्या पुढा- ज्यांना व जनतेला उद्देशन लिहिला आहे. त्या लेखांत जनतेला आत्मसंरक्षणार्थ आणि अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी स्वयंसेवकांची संघटना करण्याची सूचना केली आहे. त्यानंतर स्वराज्यपक्षाचे सभासद असेंब्लीत जाऊन तेथें त्यांनी स्वरा- ज्याची मागणी ठराव रूपानें मंजूर करून घेतल्यानंतर, सरकारनें मुडिमन कमिटी नेमली. त्या कमिटींत एकमत न झाल्यानें बहुसंख्य व अल्पसंख्य सभासदांचे वेग- वेगळे रिपोर्ट झाले, पण दोहोंतूनहि स्वराज्याच्या वाढीच्या दृष्टीने विशेष लभ्यांश कांही झाला नाहीं, हें दर्शविण्याकरितां लिहिलेला 'शंखानू दध्मः पृथक् पृथक् ' हा नववा लेख यांत घेतला आहे. स्वराज्यपक्षांतच त्यानंतर फूट झाली. एका पक्षाचें मत मंत्रिमंडळे स्वीकारावीत न्व सरकारी कमिट्यांवर काम करण्याचे पत्करावें असे होते. दुसऱ्या पक्षाचे म्हणणें की, कौन्सिले मोडण्याकरितां आपण आंत शिरलो तेव्हां तेथें मंत्रिमंडळें बनविणें • उचित नाही. या मतभेदांतून समेट करण्याकरितां साबरमतीला वकिंग कमिटीची सभा भरली आणि तींत तडजोड म्हणून असें ठरले की, ज्या प्रांतांतील कौन्सिल- रांना मंत्रिमंडळें बनवून आपल्या हाती पूर्ण सत्ता येते असे वाटेल, त्या प्रांतांतून मंत्रिमंडळे बनविण्यास हरकत नाहीं. ही तडजोड म्हणजे 'अमृतसरच्या काँग्रे- सच्या ठरावाचाच फेर स्वीकार' होय असे दर्शविण्याकरितां त्या लेखाला ' अमृत- सरच्या वाटेंतला एक टप्पा' असा मथळा दिला आहे. यानंतर १९२८ सालीं 'बार्डोलीचा नमुनेदार सत्याग्रह ' झाला. तो सत्या- ग्रह यशस्वी कसा झाला आणि सत्याग्रह करावयाचाच झाला तर तो केव्हां व कसा करावा म्हणजे विजय मिळतो, याची चिकित्सा या ११ व्या लेखांत केली