पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर वाढवावयाचेच तर हे वाढवा २२५ असाच पुरावा पाहिजे; तो कितपत अनुकूल आहे ते पाहूं. गेल्या सालच्या अंदाजपत्रकांत जमेच्या बाजूस जे आंकडे धरले आहेत ते ठोकळ मानाने पुढील- प्रमाणे आहेत :- शेतसारा ३३ कोटि, अफू २.७ कोटि, मीठ ५ कोटि, स्टंप ७॥ कोटि, अबकारी १३ कोटि, जकात ९ कोटि, ह्रीं जमेचीं मुख्य खाती झाली. यांखेरीज रेल्वे २२॥, कालवे ७, पोस्ट व तार ५ आणि इतर किरकोळ १५ कोटि असे सर्व मिळून १२० कोटींचा जमेचा अंदाज होता. या अंदाजाप्रमाणे जर सर- सालांत वसूल झाला नसेल तर पूर्वीच्या कल्पनेपेक्षां तृट अधिक येईल व ती भरून काढण्यास जादा कर बसविल्याखेरीज अन्य मार्ग नाही हे उघड होईल. पण तशी वस्तुस्थिति असण्याचा संभव कितपत आहे ! चालू जमाखर्चाची तोंडमिळवणी जमेच्या मुख्य खात्यांत शेतसारा आणि मीठ यांत तूट आलेली असण्याचा संभवच नाही. स्टँप व अबकारी या दोन खात्यांत २ कोटींची आणि जकातीत पाऊण कोटीची तूट येण्याचा संभव आहे. तथापि ह्रीं सर्व खाती मिळून ३ कोटीं- पेक्षां अधिक तूट मुळींच येणार नाहीं. उलटपक्षी इतर खालांपैकी रेल्वेचा जो अंदाज २२ कोटींचा धरलेला होता, त्यांत निदान १ कोटीची वाढच होण्याचा संभव दिसतो. तथापि पोस्ट व तार, व्याज इत्यादि जी किरकोळ खाती आहेत त्यांत वाढ होणार नाहीं; पण कदाचित् एक कोटीपर्यंत तूटच येईल. एवंच १२० कोटींच्या अंदाजपत्रकांत पूर्वी गृहीत धरलेल्यापेक्षां जमेचा आंकडा फार तर ३ कोटींनी कमी होईल. परंतु खर्चाच्या खात्यांचा विचार केला असतां बजेटांत मंजूर झालेल्या सर्वच रकमा एरवीं देखील खर्च पडत नाहीत, मग काटकसरीच्या चालू सोलांत तर काय पुसावयासच नको ! एकंदर खर्चाचा जो अंदाज आहे त्यांत लष्करखातें, बँक आणि पोस्ट व तार या खात्यांचा खर्च पूर्वी ठरलेल्या मर्यादेपेक्षां कमी होणार नाही. तथापि तो मंजुरीपेक्षा जास्त तर होत नाहीं हें खास; बाकीच्या खात्यांत बचत राहण्याचाच संभव आहे. सारांश, जमेच्या बाजूस जर ३ कोटींची तूट येईल तर खर्चाच्या बाजूसहि हात आंखडता धरल्यास तितकीच बचत राहून तोंडमिळवणी होण्यास हरकत नाहीं, व त्यासाठी कर्ज काढण्याचे किंवा कर वाड- विण्याचें प्रयोजन नाहीं हे उघडच आहे. हा सर्व चालू ठराविक उत्पन्नाच्या जमाखर्चाचा विचार झाला. याखेरीज नवीन कर्ज काढून जी कामें व्हावयाची असतात त्यांची गेल्या सालांत काय स्थिति झाली ते पाहूं. गेल्या बजेटाच्या वेळी रेल्वे, कालवे व दिल्ली नगर रचना या कार्य- त्रयीकरितां १४ कोटि, युद्ध सुरू झाल्याने १९१४-१५ सालच्या जमेत आलेली तूट व झालेले कर्ज आणि १९१५-१६ सालच्या अंदाजपत्रकांत जमाखर्चातील अंतरामुळे पडणारी तूट, या सर्वांची बेरीज मिळून ४२ कोटि रुपयांची तरतूद