पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२४ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध 1250312 होता. परंतु या वेळी अनेक कारणसमुच्चयाचा परिणाम होऊन सरकारी फडण- विसांनी कर न वाढवितां कर्ज काढूनच एकसाल गुजराण करण्याचे ठरविले, आणि त्यांचा तो विचार योग्य होता हे आम्ही त्या वेळी 'कर का कर्ज' या अग्रलेखांत दर्शविलेंच होतें. तेव्हांपासून आतापर्यंत पृथ्वीचा सूर्याभोवती आणखी एक फेरा झाला. फिरून मार्च महिना आला, आणि पुनश्च जमाखर्चाची तोंडमिळवणी कर- ण्याची वेळ येऊन ठेपली. तेव्हां तेच फडणवीस यंदा काय बोलतात ते ऐकण्या- साठी हिंदुस्थानांतले सर्व लोक सारखे कान टवकारून बसले आहेत. आणि ज्याच्या त्याच्या बुद्धिप्रमाणें व माहितीप्रमाणे जो तो तक लडविण्यांत चूर झाला आहे. एक म्हणतो मिठावर कर वाढणार, दुसरा सांगतो प्राप्तीवरचा कर अधिक करून माफीची मर्यादा संकुचित करणार, तिसरा प्रतिपादन करतो की, आयात मालावर व विशेषतः साखरेच्या व चैनीच्या पदार्थावर संरक्षक जकात बसणार, कोणाचा तर्क असा धावतो की, ताग, चहा, हाडे, कातडी वगैरेसारख्या निर्गत मालावरः जकात ठेवणार; असे एक ना दोन हजारों तर्कवितर्क चालू आहेत. त्यांतच कित्येक जे दीर्घशहाणे आहेत ते नुसते तर्क करण्यावरच समाधान ने पावतां फडणविसांना कांही क्लृप्याहि सुचवीत आहेत. दरसाल ज्या जी. सी. आय. ई. के. सी. आय. ई., रावबहादुर, खानबहादुर, दिवाणबहादुर इत्यादि शेंकडों पदव्या अर्पण कर ण्यांत येतात त्यांच्यावर जरी भला मोठा कर ठेवला तरी मानास यापलेले हे लोक कर भरून पदव्या घेतील; तर ही एक उत्पन्नाची बाब कां सोडतां, असे सुच विणारेहि कांहीं लब्धप्रतिष्ठित लोक आहेत! हिंदी लोक लग्नकार्यात खर्च फार कर- तात. तेव्हां त्या खर्चाच्या मानाने यांच्यावर 'लगीनपट्टी' बसवावी असे सुचवि- णारेहि कांही शिष्ट निघाले आहेत ! मोटारी, सायकली, टेलिफोन, विजेच्या व ग्यासच्या बत्त्या असले जिन्नस वापरण्याबद्दल कर बसविण्याची सूचना करण्या- इतकी कित्येकांची नजर सूक्ष्म झाली आहे. मग त्यांच्या दृष्टीच्या तावडीतून कोर्ट- फी, स्टँप-फी, लायसेन्स-फी, पोस्टाची तिकिटें, रेल्वेची तिकिटें इत्यादिकांचे दर वाढविण्याची कल्पना कशी सुटणार ! SPEERSSEM परंतु हे सर्व तर्क पायाशुद्ध आहेत का ? कोणता तरी का होईना; पण कर बसविल्यावांचून अथवा वाढविल्यावांचून गत्यंतर नाही अशी खरोखरीच परि- स्थिति आहे कां ! याचा विचार केला पाहिजे. युद्धास प्रारंभ होऊन जेव्हां नुकते कोठे सात महिने झाले होते, तेव्हांच जर जमाखचात येणारी तूट भरून काढण्या- करितां 'कर का कर्ज' असा प्रश्न फडणविसांच्या मनांत घोळूं लागला, तर आतां १९ महिने युद्ध चालल्यावर आणि आणखी निदान पांचसात महिने तरी ते चाल- ण्याची खात्री वाटत असल्यावर कोणता हिशेबी मनुष्य आपल्या आयव्ययाची दुःस्थिति लक्षांत घेऊन ती दूर करण्याची उपाययोजना करणार नाही ? पण हे झालें तरी केवळ अनुमानच झालें. याला खरोखरी 'हा सूर्य आणि हा जयद्रथ ,