पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध बिलकुल संभव नसतां हिंदी गिरण्यांतील कापडावर हा कर विनाकारण लादण्यांत आला आहे; आणि ह्याबद्दल सतत ओरड चालली असून व अलीकडे तिजोरीची सुस्थिति असूनहि अद्यापि हा कर माफ झालेला नाहीं. रुपयाची कृत्रिम किंमत ह्याप्रमाणे सन १८६० पासून सन १८९६ पर्यंतच्या करांची कुळकथा आहे. ह्या मुदतींत लॉर्ड मेयो, नॉर्थब्रुक व रिपन ह्या त्रयीखेरीज इतर सर्वांच्या कार- कीर्दीत गोरगरिबांना जाचणारे मिठावरील कर, लायसेन्स-टॅक्स व प्राप्तीवरील कर हे कायम होते किंवा वाढतच चालले होते; आणि खर्चाचे तोंड दिवसेंदिवस चाढतच चालल्याने कर कमी होण्याची आशा दिसत नव्हती. परंतु १८९४ साली जेव्हां चांदीचा भाव फारच खालावला आणि नुसत्या हुंडणावळीतच ७-८ कोटि रुपये गडप होऊं लागले, तेव्हां सररहा चांदी घेऊन रुपये पाडून देण्याचें बंद करण्यांत आले आणि अशा रीतीनें रुपयाला कृत्रिमपणा देऊन त्याची किंमत १६ पेन्स ठरविण्यांत आली. ह्या अद्भुत जादुगिरीनें कोणताहि नवीन कर प्रत्यक्ष न बसवितां सरकारी शिक्कयांच्या नाण्यानें सरकार देणे देणा-यांवर अप्रत्यक्ष रीतीने शेंकडा तीस ते पसतीस टक्के कर बसविल्याप्रमाणे झाला. अर्थात् ह्या नवीन क्लृप्तीपासून भरदुष्काळांत देखील खजिन्यांत शिल्लक राहूं लागली, दुष्काळी कामाकडे खर्च करण्यास सवड होऊन शिवाय कोटि दोन कोटि रुपये शेतसायाची सूट देतां आली; वाढत्या लष्करी खर्चाची बिनबोभाट तरतूद झाली आणि इतकें करूनहि तिजोरी भरलेलीच ! तेव्हां मग कर्झनसाहेबांनी मिठाचा कर दोन वेळा आठ आठ आण्यांनी कमी केला. प्राप्तीवरील कराला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाची मर्यादा ५०० होती ती हजार केली, अनेक किरकोळ स्थानिक कर माफ केले, आणि मिंटो- साहेबांच्या कारकीर्दीतहि मिठाचा कर तिसऱ्यांदा आठ आणे माफ करण्यांत येऊन दरमणी एक रुपयावर येऊन ठेपला. न्याय्य धोरणाला गालबोट ह्याप्रमाणे कर्झन-मिंटो-कारकीर्दीत मात्र खजिन्यांत शिल्लक पडली असतां भलताच कर उठविण्याची चुकी न करतां जरूर तेच कर कमी करण्यांत आले. तरी पण लॉर्ड मिंटो ह्यांच्या कारकीर्दीत ह्या योग्य धोरणाला एक गालबोट लागलेच. १८९८ सालापासून दरसाल खजिन्यांत दोन-तीन कोटि रुपये शिल्लक पडत होते. तथापि १९०८-९ साली दुष्काळामुळे आणि अमेरिका व युरोपमधील व्यापारांतील कांहीं धांदलीमुळे येथचा व्यापार कमी होऊन चार कोटींची तूट आली, अर्थात् हो तूट: आकस्मिक होय कायमची नव्हे; व तत्पूर्वीच्या दहा वर्षांच्या शिलकेच्या मानानें ती खिसगणतींतहि घेण्यालायक नव्हती; असें असून देखील ही तूट पडतांच चांदी, तंबाखू व रोकेल त्यांवरील