पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करांचा पूर्वेतिहास २२६ गिरण्या हिंदुस्थानांत सुरू होत आहेत म्हणे, असे भयसूचक उद्गारहि नमूद केले ! वरील ठरावांतील तिजोरीच्या सुस्थितीची अट वरकरणीच होती; कारण ती अक्ष- रमाः पाळली गेली असती तर आयात मालावरील जकात त्या वेळी उठलीच नसती. स्टेट सेक्रेटरीचे हे नवे धोरण त्यांच्या कौन्सिलरांस देखील मान्य नव्हते. परंतु आपल्या कौन्सिलचा विरोध बाजूस ठेवून स्टेट सेक्रेटरीने पाठविलेला हा हुकूम लिटनसाहेबांनीहि आपल्या कौन्सिलांतील बहुमत बाजूस सारून क्रमाक्रमाने अमांत आणला; आणि ग्रथम सुतावरील व तीस नंबरी सुताच्या कापडावरील जकात माफ केली. पण खजिन्यांत तूट येऊ लागली तेव्हां लायसेन्स-टॅक्स पुनः बसविण्यांत आला. अफृवरील जकात दरपेटीस ७०० रुपये केली; मिठावरील व प्रांतिक कर वाढविले आणि दुष्काळ फंडाकरितां जी रक्कम ठेव म्हणून ठेवावयाची तीहि इतर कामाकडे खर्च होऊं लागली; तरी देखील लिटनशाहीच्या अखेरपर्यंत जमाखर्चाची तोंड मिळवणी झाली नाहीं. लॉर्ड लिटनच्या कारकीर्दीच्या अखेरच्या सालीं वसूल जमा ७४ कोटि असून खर्च ७८ कोटीपर्यंत वाढला होता. आयात जकातीच्या चढउताराचा गोंधळ त्यानंतर रिपनसाहेबांची उदार कारकीर्द सुरू होऊन त्यांनी खर्चाचें मान सत्तर कोटींच्या आंत आणले. तेणेंकरून खजिन्यांत शिक्षक पडतांच मिठावरील कर आठ आणे कमी करण्यांत आला आणि सर्वच आयात जकात माफ झाली; अफूवरील दस्तुरीहि ६५० रुपये करण्यांत आली. परंतु हिंदी लोकांच्या कम- नशिबानें डफरिनसाहेबांच्या कारकीर्दीत ब्रह्मदेशाची स्वारी झाली आणि लष्करी खर्च कायमचाच वाढला. त्याच वेळेपासून चांदीचा भाव उतरून हुंडणावळीतहि विशेष नुकसान होऊं लागले. तेव्हां खर्चाची तरतूद करण्यासाठी आयात मालावर जकात न बसवितां लायसेन्स-टॅक्सऐवजी प्राप्तीवरील कर बसविण्यांत आला आणि रॉकेल तेल व मीठ त्यांसारख्या गरिबांनाहि अत्यंत आवश्यक अशा जिनसांवरील कर वाढविण्यांत आला ? परंतु तेवढ्यानेंदि हुंडणावळीचें व इतर खर्चाचें तोड आवरेना, तेव्हां मग १८९४ साली आया मालावर पांच टक्के जकात बसविण्याचें ठरले. पण त्यांत मौज ही की, सर्व आयात मालांत जवळ जवळ निम्या किंमतीचा माल जो विलायती कपडा त्यावरच तेवढी जकात माफ ! तरी देखील खर्च भागेना. तेव्हां मग कापडावर व सुतावर देखील पांच टक्के जकात बसली. त्याबरोबर लँकेशायरमध्ये खळबळ उड़न जाऊन मताला माफी मिळाली व कापडावरील जकात ३॥ टक्के करण्यात आली आणि या जकातीमुळे येथील गिरण्यांस सवलत मिळाल्याप्रमाणे होईल म्हणून येथे तयार होणा-या कापडावरहि ३|| टक्के कर बसविण्यांत आला. आयति कापड बहुतेक तीस नंबरोवेरील असतें व येथें तयार होणारे कापड या नंबरा यात असते, तेव्हा या दोहोत चढाओढ होण्याचा मौर