पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३ होते, त्यांच्या कल्पनां निराधार असून हिटलर हा बर्लिनमधून युद्ध करीत करीतच मृत्युमुखी पडला, असें निश्चित मत या लेखांत दिले आहे. हेच मत अखेरीस सप्रमाण खरे ठरलें. २८ रत्नांच्या वांढणीची वाट काय या शेवटच्या पर्वात महायुद्धांतील विजयानें कोणाकोणाला काय लाभ होईल याविषयीं तर्क केला असून अखेरीस हिंदुस्थानच्या वांटणीला शंखच येईल अशी भीति व्यक्त केली आहे. अशा प्रकारें महायुद्धाच्या बीजारोपणापासून तों विजयी राष्ट्रांच्या लुटीच्या वांटणीपर्यंतची हकीकत १८ लेखांत देऊन हें महायुद्धाचें पर्व संपविले आहे. त्यानंतर १९ इंग्लंड व रशिया यांची तेढ - या समारोपाच्या लेखांत युद्धसमाप्ती• नंतर इंग्लंड व रशिया यांच्यांत तेढ कंशी सुरू झाली याची मीमांसा करून भावी कलहाचें सूत उवाच करून ठेवले आहे. अशा रीतीनें या लेखसंग्रहांतला पहिला विभाग संपला. देशांतील राजकीय घडामोडी या विभागांत जे लेख समाविष्ट केले आहेत ते स्वदेशांतील घडामोडींचेच असल्याने वाचकांना ते अगदींच अपरिचित असे नाहीत. यास्तव त्यांचा खुलासा करावयास नको. प्रत्येक लेखाच्या शिरोभागी त्या त्या लेखांतील मथितार्थ दिला असल्यानें लेखाचा मागील संदर्भ समजणे सुलभ होईल. या विभागांतील पहिला लेख 'प्रांतिक स्वराज्याचा पहिला हप्ता' हा आहे. त्या वेळीं अधिकार-विभागणी व विकेंद्रीकरण सुरू झाले, आणि ब्रिटिश सरकार आपल्या हातची सत्ता अंशाअंशानें सोडूं लागले. हा स्वराज्याचा पहिला इसा किती क्षुल्लक आहे तें या लेखांत दर्शविले आहे. त्यानंतर पांच वर्षीच्या अवधीत स्वराज्याची एकमुखी मागणी बळावली आणि होमरुलंची चळवळ जोरांत आली. तेव्हां ती दडपून टाकण्याकरितां बेझंटबाईंना स्थानबद्ध करण्यांत आले. या दडप- शाहीमुळे होमरूलची चळवळ दवण्याऐवजी जोरानें उसळी मारून कशी वर आली याचें वर्णन करावयाला गेला एक, आणि झाले भलतेंच' या दुसऱ्या लेखांत आले आहे. 6 बेझंटबाईच्या स्थानबद्धतेचें पर्यवसान बेझंटबाई काँग्रेसच्या अध्यक्ष होण्यांत झाले. म्हणून तिसऱ्या लेखांत 'कलकत्याच्या काँग्रेसची अपूर्तता' वर्णिली आहे. दरम्यानच्या काळांत युरोपांतले पहिले महायुद्ध जोरांत आले होतें व ब्रिटिश सरका- रला रिक्रूटभरतीची चणचण भासूं लागली होती. हिंदुस्थानला स्वराज्याचे हक देऊं केल्यास लष्करभरती वाटेल तितकी होण्याजोगती असून ब्रिटिश सरकारला वसा- हतींकडे भिक्षा मागण्याचे डोहाळे आठवले आहेत, असें दर्शविण्यास्तव 'घरीं कामधेनु पुढें ताक मागें' हा चवथा लेख येथें दिला आहे.