पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध पेक्षां इ. स. १८५९ पासून १९१५ पर्यंतच्या जमाखर्चात कोणकोणत्या करांत कसकसा फेरबदल करण्यांत आला, ते कालानुक्रमानेंच सांगणे विशेष प्रशस्त असल्याने पुढील विवेचनांत ही कालानुक्रमपद्धतीच स्वीकारली आहे. इ. स. १८५७ सालीं शिपायांच्या बंडाचा वणवा पेटून शांत झाल्यानंतर हिंदुस्थानचा राज्यकारभार खुद्द राणीसरकारकडे येऊन तो ब्रिटिश पार्लमेंटाच्या मार्फत चालू झाला. ह्या अधिकारपरिवर्तनाच्या पूर्वी हिंदुस्थानचें उत्पन्न अवघे ३१ कोटि रुपये असून खर्चहि बेतानें होता, व त्या वेळी कंपनीसरकारला कर्ज सुमारें ६० कोटि रुपये होते; परंतु बंडाच्या साली व पुढे स्थिरस्थावर होईपर्यंत एक-दोन वर्षात हा कर्जाचा बोजा १०० कोटींपर्यंत वाढला. त्यामुळे जरी वार्षिक उत्पन्नहि ४० कोटींपर्यंत वाढले होते तरी, कर्जावरील व्याजाचा बोजा वाढल्यानें व इतर कारणांनी खर्चाची मजल ५० कोटींपर्यंत गेली. अर्थात् जमाखर्चात येऊं लागली. त्या वेळी जमेच्या मुख्य बाबी म्हणजे जर्मानमहसूल, मिठावरील कर, अफूचें उत्पन्न व आयात-निर्गत मालावरील जकात एवढ्याच होत्या. आयात जकात वाढविली हिंदुस्थानचा कारभार हाती येतांच 'प्रथमग्रासे मक्षिकापातः ' म्हणतात त्याप्रमाणे सरकारला वाढता खर्च भागविण्याकरितां आयात मालावरील जकात वाढवावी लागली. त्यापूर्वी विलायती सुतावर ३३ टक्के, विलायती मालावर व कापडावर ५ टक्के आणि इतर देशांच्या मालावर १० टक्के असा जकातीचा निरख होता; पण आतां तो बदलून चैनीच्या पदार्थावर २० टक्के व इतर सर्व मालांवर १० टक्के आणि सुतावर ५ टक्के जकात ठरविण्यांत आली. ह्या योगानें उत्पन्न तीन कोटींनी वाढले; त्याच वेळी खर्चातहि दान कोटींची काटकसर करण्यांत आली; तथापि जमाखर्चाची तोंडमिळवणी होईना. तेव्हां १८६० साली आयात मालावरील जकात सरसकट १० टक्के करण्यांत आली, प्राप्तीवर कर बसविण्यांत आला, मिठावरील कर आठ आणे वाढविला आणि पावल्या व हुंड्या यांना एक आण्याचीं तिकिटें लावण्याचा कायदा कर- ण्यांत आला. अशा रीतीनें जमाखर्चाची तोंडमिळवणी झाली एवढेच नव्हे तर, १८६१-६२ सालअखेर खजिन्यांत एक कोटीची शिल्लकहि राहिली. विलायती सुतावर व कापडावर १० टक्के जकात असल्यानें मुंबईच्या व्यापायां सुताच्या व कापडाच्या गिरण्या काढण्यासहि प्रोत्साहन मिळाले, आणि त्या योगें मुंबई इलाख्यांतील गिरण्यांच्या धंद्यास प्रारंभ झाला. पण लॅकेशायरच्या कारखानदारांस त्याचें वैषम्य वाटू लागले आणि लगेच १८६२ साली सुतावरील जकात फिरून ३३ टक्के व कापडावरील जकात ५ टक्के करण्यांत आली; आणि पुढील साली इतर माला- वरची जकात देखील १० होती ती ७३ पर्यंत उतरविण्यांत आली. वास्तविक