पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करांचा पूर्वेतिहास २१७ करांचा पूर्वेतिहास [ पहिले महायुद्ध सुरू झाले होते व हिंदुस्थानचा खर्च वाढत चालला होता, तरी त्या वर्षी फडणीस सर वुइल्यम् मेयर यांनीं करवाढ न करतां अंदाजपत्रकाची कशीबशी तोंडमिळवणी केली. त्या वेळी असेंब्लीत त्या संबं धानें बरीच चर्चा झाली. अशा वेळीं हिंदी जनतेवर कोणते कर, केव्हां, कशा- साठी लादले व त्यांत वेळोवेळी कशी वाढ अथवा घट करण्यांत आली याचा इतिहास उद्बोधक होईल हैं जाणून १८५७ पासूनचा हिंदी करांचा जुना इतिहास या लेखांत ग्रथित केला आहे. त्यांत कोणत्या प्रसंगी कोणता कर वाढवावा अथवा कमी करावा या संबंधाचें तात्विक विवेचनहि असून कोणत्या व्हाइसरॉयांनी न्याय दिला आणि कोणीं अन्याय केला याची चिकित्साहि या लेखांत सविस्तर केली आहे. ] कांहीं करांची कुळकथा नुकत्याच झालेल्या वरिष्ठ कौन्सिलच्या बैठकीत फडणीस सर वुइल्यम् मेयर ह्यांनी पुढील सालच्या अंदाजपत्रकांत नवीन कर न बसवितां जमाखर्चाची तोड- मिळवणी करण्याचे जे योग्य धोरण स्वीकारले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन कर- तांना आम्ही असे विधान केले होते की, करांच्या बाबतीत त्यापूर्वी असले योग्य धोरण बन्याच वेळां संभाळण्यांत आले नाही. त्या विधानाची प्रचीति पटविण्या- करितां आजपर्यंतच्या जमाखर्चाचे सिंहावलोकन करून हल्ली हयात असलेल्या व सध्यां नामशेष झालेल्या कांहीं करांची कुळकथा पाहणें अवश्य आहे. कर बसविंगे, वाढविणें, कमी करणे किंवा पूर्ण माफ करणे या चारद्दि प्रका रांत प्रसंगविशेषी भलतेंच धोरण स्वीकारल्यानें अन्याय होऊ शकतो. जरूरी नसतां अगर जरूरीपेक्षा अधिक कर बसविणें अथवा वाढविणें, जरूरी नाहींशी झाली असून देखील नवीन बसविलेला अथवा वाढविलेला कर कमी न करणे, अवश्य प्रसंगी ज्या प्रकारचा कर बसविणे योग्य होईल तो बसवावयाचा सोडून भलताच कर बसविणे, आणि शिहक अधिक राहिल्याने कर कमी करावयाची पाळी आली असतांना खरा जाचक कर माफ न करता दुसराच एखादा कर कमी करणे अगर पूर्ण माफ करणे, असे ह्या प्रकारांचे विविध स्वरूप असं शकते. यांतील एकेक प्रकार घेऊन तसले उदाहरण आढळून येते की नाही, हे पाहण्या- ( केसरी, दि. २३ मार्च १९१५ )