पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कालवे का रेल्वे ? २१५ व्यापायांची कालव्यांच्या कामाकरितां कधींहि ओरंड ऐकू येत नाही, परंतु रेल्वे- साठी मात्र सारखी धडपड चालू असते. व्याजाचा भरणा विलायतेंत करावा लागतो हा सर्व विचार नव्या कामाचा व नव्या भांडवलाचा झाला. एकदां एखाद्या रेल्वेचा रस्ता चालू झाला म्हणजे त्यावरील किरकोळ दुरुस्तीचा खर्च, क्षुल्लक फेर- फार करण्याचा खर्च, भांडवलावरील व्याज एवढ्या रकमा दरसालच्या सामान्य वसुलांतून खर्ची पडतात. ह्या खर्चातहि विलायतेंत होणारा आणि हिंदुस्थानांत होणारा असे पोटभेद आहेत. ह्या बाबतीत तर रेल्वेवरील विलायतेंतील खर्चाचें प्रमाण शेंकडा ७० असून अवघा ३० टक्के खर्च काय तो हिंदुस्थानांतल्या हिंदु- स्थानांत होतो. परंतु कालव्याकडील खर्चात मात्र शेकडा १८ टक्केच विलायतेंत खर्च होऊन बाकीचा ८२ टक्के खर्च ह्या देशांतच होतो. हा खर्च दरसालच्या सामान्य वसुलांतून होत असून त्यांत त्या त्या खात्याकडे खर्च करण्याकरितां काढ- लेल्या कर्जावरील व्याजाची रक्कमच मुख्य असते. रेल्वेकरितां काढलेले कर्ज बहु- तेक युरोपिअन कंपन्यांचेंच असल्यामुळे त्यावरील व्याजाची फेड करण्याकरितां बरीच मोठी रक्कम दरसाल विलायतेंत हिंदुस्थानच्या नांवानें खर्च पडून युरोपिअन सावकारांच्या हातीं पडते. आतां पूर्वी एकवार घेतलेला अठरा कोटींचाच हिशेब पुढे चालू ठेविल्यास ह्या जमाखर्चाचा नीट खुलासा होईल. अठरा कोटि नव्या भांडवलापैकी पांच कोटींचा माल प्रारंभीच विलायतेंत खरेदी होऊन ते रुपये तेथल्या कारखानदारांना मिळाले व त्यांतला बराच भाग पुनः भांडवलाचें रूप धारण करून दुसऱ्या वर्षी काढावयाच्या कर्जाची वाट पाहत राहिला. तेरा कोटि रुपये खर्च झाले, त्यांतले हिंदी मजर व कारखानदार ह्यांच्या वांट्यास किती आले, त्याचा हिशेब पुढे द्यावयाचा असल्यामुळे तूर्त सोडून देऊं. दोन्ही देशांत मिळून कसेबसे १८ कोटि रुपये खर्च झाल्यावर दुसऱ्या वर्षापासून त्याच्यावरील व्याजा- दाखल सुमारे पाऊण कोटि रुपये विलायतेंत भरणा करावे लागतात. व्याजाच्या दरांत रेल्वेवरील व कालव्यावरील भांडवलांत कांहीं फरक नसल्यामुळे त्याबद्दल कांही तक्रार करतां येत नाहीं. तथापि रेल्वेकडील अठरा कोटि भांडवलापैकी तेरा कोटीच ह्या देशांत खर्च झाले असून, अठरा कोटींवर व्याज भरावे लागतें; कालव्यावरील खर्चातील बहुतेक भाग येथेंच खर्च झाल्यामुळे त्यांत हा फरक इतका ठळक दिसण्याजोगा नसतो. युरोपिअन पगारदार आणि पेन्शनर्स आतां रेल्वे तयार होत असतांना व ती तयार झाल्यावर तीवर जो खर्च होतो त्यांतील : कितवा भाग युरोपिअन व युरेजिअनांच्या पदरांत पडतो व हिंदी लोकांच्या वांटणीस किती येतो ते पाहूं. पब्लिक सर्व्हिस