पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१४ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध एका युरोपियन महापंडितानें तर अशी भीति एकदां प्रदर्शित केली होती की, सरकार जर विनाकारण अधिक कालवे करण्याच्या भानगडीत पडेल तर पुरेशा रेल्वेच्या अभावी कालव्याने होणारे पीक शेतांतल्या शेतांतच कुजून जाईल ! कोड्याचा थोडासा उलगडा युरोपिअन व्यापान्यांचा कालव्यांपेक्षां रेल्वेकडे ओढा अधिक असण्याला उपरिनिर्दिष्ट कारण तर आहेच, पण त्यापेक्षांहि प्रबल असे दुसरेहि एक कारण आहे. रेल्वे किंवा कालवे ह्यांकडे सालोसाल खर्च होणाऱ्या रकमांचा हिशेब तपा- सून पाहिल्यास असे दिसून येईल की, त्यांतला कांही खर्च विलायतेंत होतो व कांहीं येथें होतो. ह्या खर्चातहि दोन प्रकार आहेत. पहिला नवीन भांडवल जमवून नव्या कामावर होणारा खर्च; आणि दुसरा चालू जमाखर्चातून चालू कामावर होणारा खर्च. ह्या उभयविध खर्चाचे दोन्ही देशांतील आंकडे ताडून पाहिल्यास प्रारंभीच्या कोड्याचा थोडासा उलगडा होईल. गेल्या दहा वर्षात नवीन भांडवला- तून रेल्वेकडे झालेल्या खर्चातला शेकडा २८ टक्के खर्च विलायतेंत होऊन शेंकडा ६२ टक्के खर्च येथे झाला. कालव्यांकडील खर्चात हेंच प्रमाण ५ आणि ९५ आहे. अर्थात् युरोपिअन व्यापा-यांचा रेल्वेविषयी आग्रह का आणि कालव्यांकडे त्या मानानें बेफिकिरी कां तें यावरून स्पष्ट होते. परंतु तेंच स्पष्टतर होण्याला विलायतेंत हा खर्च कां होतो व दोहामध्ये इतकें अंतर कां ह्याचे विवेचन करणे जरूर आहे. विलायती कारखानदारांचा फायदा पुढील सालाकरितां रेल्वेकडे अठरा कोटींची रक्कम मंजूर झाली आहे. तिचाच विनियोग वरील प्रमाणाच्या अनुरोधाने कसा होईल ते सांगितल्यास हे विवेचन विशदतर होईल. रेल्वेकडे जें नवें भांडवल दरसाल घालावयाचें त्यांतला बराच भाग चालू रस्त्यांवर सुधारणा करण्यांत खच होतो; आणि त्यांत मालाच्या डब्यांची वाढ करणें ही बाब मुख्य असते. मालाचे डबे, उतारूंचे डबे, एंजिनें, रूळ, रुळाखालील पोलादी पाट वगैरे सर्व माल विलायतेंतील कंपन्यांकडे खरेदी होऊन इकडे येतो. ह्या खरेदीकडेच मंजूर झालेल्या १८ कोटि रकमेतून शेंकडा २८ प्रमाणे पांच कोटि रुपये खर्च होतात. बाकीचे तेरा कोटि रुपये रस्त्यांची, स्टेश- नांची, डब्यांची दुरुस्ती करणे वगैरे कामाकडे ह्याच देशांत खर्च होतात. हे इतकेच रुपये कालव्यांकडे मंजूर झाले असते तर त्यांतून अवघे एक कोटि देखील विलाय- तैंत खर्च न होतां सतरा कोटींहून अधिकच रुपये येथल्या येथे खर्च झाले असते; कारण कालव्यांकरितां कांहीं लोखंडी किंवा पोलादी सामान (टिकाव फावड्यां- खेरीज ) अथवा मोठ्या किमतीची यंत्रे विलायतेंतून सालोसाल खरेदी करून आणावी लागत नाहीत. सारांश, रेल्वेपेक्षां कालव्यांत विलायती कारखानदारांचें मालाच्या खपाच्या दृष्टीने शेकडा २३ टक्के नुकसान आहे; आणि म्हणूनच ह्यां