पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कालवे का रेल्वे ? २१३ HAR. चलवाले स्टेट सेक्रेटरीला गळ घालतात आणि त्यांच्याकडून रेल्वेकडे खर्च व्हावयाची रक्कम अगाऊच ठरवून घेतात; आणि मग येथल्या फडणिसांना तो संकल्प पुरा पाडण्याकरितां विश्वप्रयत्न करावा लागतो. इ. स. १९०७-८ साली मॅके-कमिटीने रेल्वेकडे· सालीना १८ कोटि रुपये खर्च व्हावे असा अभिप्राय देऊन ठेवला तरी प्रत्यक्ष तितकी रक्कम आजपर्यंत खर्च झाली नव्हती. परंतु १९१३-१४ साली १८ कोटींच्या मंजुरीवरहि चढ होऊन मंजुरीविना २५ लाख रुपये अधिक खर्च झाले आहेत. गेल्या पांच वर्षात रेल्वेच्या खर्चाची वाढ कशी झपाट्याने होत आहे आणि त्या मानाने कालव्यांकडे कसे दुर्लक्ष होत आहे ते बजेटाच्या तपशिलांत दिलेल्या आंकड्यांवरून स्पष्टपणे नजरेस येत आहे. पांच वर्षांच्या अवधीत रेल्वेकडे सर्च दीडपटीने वाढला, परंतु कालव्यां- कडील रकम मात्र लंबकासारखे हेलकावे खाऊन पांच वर्षांपूर्वी होती लापेक्षांहि मागेच चालली आहे. कोणत्याहि देशांत रेल्वेपेक्षां कालव्यांकडे खर्च कमीच होतो व तो तसा असणे हे स्वाभाविक आहे. तथापि एका कामाकडे पैशाच्या थैलीच तोंड मनमुराद मोकळे सोडावयाचे आणि दुसरीकडे असलेले तोंड देखील गळचेपी होईपर्यंत आवळावयाचे ह्याचा अर्थ काय ? चाल सालच्या अंदाजपत्रकावरं कडाक्याचा वादविवाद झाला व आणखी व्हावयाचा आहे. त्या वादांत त्या पक्ष- पाताबद्दल खरपूस टीका झाली व होत आहे; पण त्या टीकेचा प्रत्यक्ष उपयोग होऊन रेल्वेकडचे दोनतीन कोटि रुपये उचलून कालव्यांकडे अथवा शिक्षणाकडे घालण्याची अद्भुत शक्ति सर गाय प्लटिवुड् ह्यांनी म्हटलेल्या 'बड्या जादुगारा'च्या अंगीहि नाहीं हे अगदी निर्विवाद आहे. स्टेट सेक्रेटरीच्या पाठीमागें लकडा 'इंग्लंड है मारवाडी राष्ट्र आहे; हिंदुस्थान सरकारहि बजेटांतील प्रत्येक पैन्-पैचा मोबदला कोणला रूपानें किती मिळतो हे डोळ्यांत तेल घालून पाहत असते,' असे गृहीत धरले तरी या कोड्याचा उलगडा होत नाहीं; कारण आजवर रेल्वेकडे जे पांच अब्जांहून अधिक रुपये खर्च झाले आहेत त्यांवर निवळ व्याज शेंकडा दीड टकाहि सुटत नाही आणि कालव्यांकडे जे चौपन्न कोटि रुपये भांडवल गुतले आहे त्याच्यावर पांच टके व्याज सहज सुटते, असे सरकारच सांगतें. अर्थात् हा आवडीनावडीचा प्रकार व्याजाच्या जास्तकमी दरावर अवलंबून नाही, तर मग ह्याचे बीज आहे तरी कशांत ? तर विलायतेंतील भांडवलवाले व व्यापारी ह्यांचा स्टेट सेक्रेटरीच्या पाठीमागे जो लकडा लागतो यांतच ह्याचें बीज आहे. हिंदुस्थानांतून कापूस, गहूं, गळिताची धान्ये वगैरे जिन्नस मुख्यत्वेकरून निर्गत होतात. त्यांची जी ही पैदास होत आहे तेवढीचाच उठाव रेल्वेकडून वेळेवर होत नाहीं. मग आणखा कालवे काढून धान्य अधिक पिकवून करावयाचे आहे काय ? व