पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध कालवे का रेल्वे ? CAREER [ हिंदुस्थानांतील सुबत्ता वाढविण्याकरितां कालवे काढण्याची अत्यंत जरूरी असतां हिंदुस्थान सरकार नवें कर्ज काढून रेलवेचा प्रसार करते, पण कालव्यांचा प्रसार करतांना हात आखडते. याचे कारण काय याची चिकित्सा या लेखांत केली असून असे दर्शविलें आहे की, रेल्वेचा प्रसार होण्यांत विला- यती मांडवलवाले व व्यापारी यांचा जसा फायदा होतो तसा कालव्यांच्या प्रसारानें त्यांचा फायदा होत नसल्यानें, सरकार कालव्यांच्या ऐवजी रेल्वेच्या प्रसाराकडेच अधिक लक्ष देतें. ] रयतेस पाण्याची जरूरी कांही दिवसांपूर्वी विलायतेत 'नॅशनल लिबरल लवांत भाषण करतांना मि. ब्राइस यांनी, वसाहतींत वर्णद्वेषाचे पीक फार माजले असल्यामुळे हिंदी लोकांनी आपला देश सोडून दुसरीकडे जाऊं नये असे प्रतिपादन केल्याचे वाचकांस विदित आहेच. ब्राइससाहेबांचा हा अनाहत उपदेश येथें तर कोणास पटावयाचा नाहींच, पण विलायतेंतील हिंदी लोकांचे हितकर्ते सर वुइल्यम् वेडरबर्न त्यांना देखील तो पटला नाही. त्यासंबंधी त्यांनी 'डेली न्यूज अँड लीडर 'मध्ये एक पत्र लिहिले असून त्यांत ते म्हणतात की, - "हिंदी शेतकऱ्याला गांवानजीकच विहीर किंवा कालवा असलेली थोडी जरी जमीन असली तरी तो मातृभूमीचा त्याग करणार नाही. हिंदी रयतेस जर कशाची जरूरी असेल तर ती पाण्याचीच होय. परंतु कालवे काढावयाचे सोडून रेल्वेकडेच अतिशय भांडवल खर्च होत आहे, अशी हिंदी लोकांची नेहमीच तक्रार आहे. मोठमोठ्या जमिनी जलाभावामुळे पड पडल्या आहेत. त्या जमिनींना कालव्यांचे पाणी मिळेल तर एकहि हिंदी मजूर, ज्या देशांत आपली किंमत राहत नाहीं, अशा परदेशांत जाणार नाही. " सर बुइल्यम् वेडरबर्न त्यांनी म्हटल्याप्रमाणे हिंदी पुढाऱ्यांची ही तक्रार आज तीस- चाळीस वर्षे चालू आहे. परंतु सरकारचा आगगाडीकडे ओढा अद्यापि कमी होत नाहीं, येवढंच नव्हे तर तो दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. रेल्वेकडील खर्चाची वाढ गेल्या आठवड्यांत वरिष्ट कायदेकौन्सिलांत १९१४-१५ सालचें जें अंदाज- पत्रक मांडण्यांत आले त्यावरून देखील हीच गोष्ट स्पष्ट होते. विलायतेंतील भांड (केसरी, दि. १० मार्च १९१४ )