पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केली कोंडी पण झाला कोंडमारा २११ आठवण होत नाहीं हें नवल नव्हे काय ? परंतु आतां ह्या सर्व वादापासून फलनिष्पत्ति कांहींच नाहीं हे उघड आहे. शेठ चुनीलाल, चांदीची कोंडी, आणि त्या कोंडीचें साधन स्पीशी बँक, ह्या तीन गोष्टींचें साहचर्य शेठजीं- च्या हितशत्रूंस नकोसे झाले होतें. ह्या तीनहिपैकी कोणतीहि एक गोष्ट नाहींशी झाल्याने त्यांचा जीव थंड झाला असता; परंतु आतां तर त्यांच्या सुदैवाने ह्या त्रयीपैकी शेटजी व चांदी ही दोन नाहींशी झाली. तेव्हां राहतां राहिली बिचारी बँक ! ती आतां चालल्यापासून ह्या हितशत्रूंचें विशेष कांहीं नुकसान नाही. तेव्हां आतां ती 'नांगी मोडलेली' स्पीशी बँक पुनः चालावी, निदान भागीदारांचे व ठेवीदारांचे नुकसान तरी होऊं नये म्हणून टाइम्ससारखीं पत्रेंच उपदेश करूं लागली आहेत, आणि चुनीलालचा बळी घेतल्या- नंतर मुंबादेवीहि शांत होऊन आतां तेथील सांपत्तिक वातावरणहि बदलं लागले आहे. स्पीशी बँकेच्या वेळी एकट्या एक अर्जदाराच्या हेकेखोरपणामुळे एवढ्या बँकेवर गदा आणली गेली ही स्थिति चांगली नव्हे, सबब निदान अर्धे भांडवलवाले तरी एक- मतांचे झाल्यावांचनं बँकेविरुद्ध लिक्विडेशनचें काम चालू नये, असे मि. ग्रॅहॅमसारखे युरोपिअन व्यापारीच म्हणूं लागले आहेत; आणि मर्चेंट्स बँकेच्या विरुद्ध खोटा अर्ज करणारांवरच काम चालावें असा आतां न्या. दावर ह्यांनी आपला अभिप्राय दर्शविल्यावरून तर भावी अर्जदारांस भीतीच बसून ह्यापुढे ही दिवाळ्यांची सांथ मंदावेल, किंबहुना अजीबात बंद होईल, अशीं पूर्वचिन्हेंहि दिसू लागली आहेत. स्पीशी बँकेचें कोट्यवधि रुपयांचे नुकसान झाले म्हणून सुरू झालेली ओरड मंदा- वत जाऊन आतां ठेवीदारांचें तर नुकसान होणार नाही, भागीदारांचे झाल्यास थोडेसें होईल असे अभिप्राय बाहेर पडू लागले आहेत. त्या सर्व बदललेल्या परि- स्थितीचा परिणाम चांगलाच होईल. मुंबईच्या व्यापारास दिवाळ्यांच्या सांथीमुळे 'बसलेला धक्का नाहींसा होऊन सर्व व्यवहार पुनः पूर्ववत् चालू लागतील; आणि स्पीशी बँकेविरुद्ध ज्यांनी ज्यांनी हत्यार उचलले होते त्यांची हत्यारें अल्पावधीनेंच बोथट होऊन जातील. पण त्या हत्यारांच्या माझ्यामुळे गतप्राण होऊन गेलेल्या चुनील शेठजींचा देह कांहीं आतां पुनः परत येत नाही. तथापि आपण चाल- विलेली बँक आपल्या पश्चात् बंद न पडतां, कमजोर होऊन का होईना, पण चालू, आहे एवढे जरी त्यांस दिसून येईल तरी देखील त्यांच्या आत्म्याची तळमळ अल्पांशानें तरी शांत होईल यांत संशय नाहीं. पण वाईट करणे सोपे असते, तितकें चांगले करणे सोपे नसतें, यामुळे स्पीशी बँकेची विसकटलेली घडी फिरून बसावी अशी आमची कितीहि इच्छा असली तरी ती तशी बसण्याचे काम फार मुष्किलीचें होऊन बसले आहे, मग स्वदेशीच्या नशिबाने काय होतें पाहावें ?