पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१० श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध वीर पुढे सरसावले आहेत ! उदाहरणार्थ, टाइम्सकार आतां मोठ्या पोक्तपणानें ‘परोपदेशे पांडित्यं' करून मुंबईच्या व्यापाऱ्यांना सांगतात की, पाहा लंडनच्या व्यापायांनी ज्याप्रमाणे चुनीलालची चांदी खरेदी केली त्याप्रमाणे तुम्ही आतां मोती खरेदी करा ! होय, लंडनच्या व्यापायांप्रमाणे येथल्या व्यापा-यांनाहि थोड्या व्याजाने कर्जाऊ रकमा, वाढती किंमत, सरकारसारखें खात्रीचें गिन्हाईक आणि वर भरपूर कमिशन इतके मिळण्याची आशा असती तर त्यांनींहि ती खरेदी केली असती. परंतु त्यांतली प्रत्येक गोष्ट येथल्या व्यापाऱ्यांना प्रतिकूल आहे, हें • टाइम्सकारांस ठाऊक नाही की काय ? यांत रयतेचें नुकसान कोणते ? बरं तें सर्व असो. चुनीलालनी चांदीची कोंडी केल्यामुळे स्पीशी बँकेचें नुक्र- सान झाले असेल आणि त्याबद्दल त्या बँकेच्या ठेवीदारांस व भागीदारांस प्राय- चित्त भोगावे लागेल; पण ह्या चांदीच्या कोंडीत हिंदी रयतेचा जो ओढूनताणून संबंध टाइम्सने आणला आहे तो कां ? टाइम्सकार म्हणतात की, जर चुर्नालालची कोंडी फुटली नसती तर चांदी महाग होऊन सरकारचें म्हणजे पर्यायानें रयतेचेंच नुकसान झाले असतें. पण हे कोडे आम्हांस तरी उमगत नाही. सरकार चांदी खरेदी करतें ती केवळ नाणे पाडण्याकरितां होय. ह्या व्यवहारांत हल्लीच्या रुपयाच्या कृत्रिम किंमतीने सरकारला शेंकडा ३० ते ३५ टक्के नफा मिळतो व तो नफा गंगाजळी ठेव म्हणून वेगळा ठेवला जातो. आतां जर चुनीलाल यांच्या हातास यश आलें असतें व सरकारला महागाईची चांदी खरेदी करावी लागली असती तर सरकारचा टांकसाळीपासूनचा नफा शेंकडा: ३० ते ३५ च्या ऐवजी २० ते २५ झाला असता व गंगाजळी ठेवीत थोडी भर कमी पडली असती. परंतु त्यामुळे प्रजेचें नुकसान तें काय होणार ? जोपर्यंत रुपयाचा भाव पौंडास पंधरा असा ठरला आहे तोपर्यंत सरकारने चांदी कोणत्या भावाने खरेदी केली ह्याचा विचार करण्याचें प्रजेला कारणच नाहीं. बरें, खासगी व्यापारी कांही चांदी खरेदी करतात, त्यांचें नुकसान झाले असतें म्हणावें तर तेंहि बरोबर नाही. कारण एखाद्या वर्षी नवी चांदी जर थोडीशीं महाग झाल्यामुळे नुकसान झालें तर पूर्वीच्या शिल्लक असलेल्या चांदीच्या भावाच्या वाढीने त्याच्या शतपट नफाहि होतो; आणि जोपर्यंत दागिन्यांच्या किंवा गटांच्या रूपाने शिल्लक असलेल्या चांदीपेक्षां नवीन खरेदी अधिक नसते तोपर्यंत चांदीचा भाव वाढल्यानें रयतेचें नुकसान होण्याचें बिलकूल कारण नाहीं. विस्कटलेली घडी बसणे कठीण तेंहि असो. परंतु रयतेच्या नफानुकसानीची खोटीच सबब पुढे आणून हल्ली नकाश्रु ढाळणाऱ्या टाइम्सला इतर कोणत्याहि खऱ्या जरूरीच्या प्रसंगी रयतेची