पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केली कोंडी पण झाला कोंडमारा 12 २०९ दुसऱ्यावर अवलंबून राहावें लागले आणि युरोपिअन कंपन्यांच्या हातून काढून घेतलेला व्यवहार आपले एजंट म्हणून लंडनांतल्या एका कंपनीकडेच यावा लागला. एवढ्यानहि भागले नाही तेव्हां सरकारने मांटेग कंपनीला गुतपणे आपल्याकरितां चांदी खरेदी करण्याचे कंत्राट दिले; त्यांनी दिलेला चढा भाव ( २९ पेन्स) कबूल केला; आणि शिवाय ह्या व्यवहाराबद्दल कमिशन निराळंच दिलें. ह्याखेरीज स्टेट सेक्रेटरीकडून थोड्या व्याजानें दीड कोटि कर्ज आणि चांदीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेला नफा हे फायदे वेगळेच. माँटेग कंपनीलाच चांदी विकावी लागली

  • ·

2700 आतां चुनीलाल यांजकडून चांदी खरेदी करण्यांत सरकारचे ह्याच्यापेक्षां अधिक नुकसान कोणतें झालें असतें ! पण नाही. यामुळे चुनीलाल ह्यांनी चांदीची कोंडी केली खरी, परंतु त्यांचाच उलट कोंडमारा झाला. प्रतिपक्षी मांटेग कंपनीला जितक्या सवलती अधिक तितक्याच चुनीलाल यांच्या मागीत अडचणी अधिक अशी स्थिति झाली, तरी ते डगले नाहीत; आणि इतक्या अडचणींतूनहि त्यांनी सरकारला थोडीबहुत चांदी आपल्याचकडून खरेदी करावयास भाग पाडले. आपण होऊन चक्रव्यूहांत शिरल्या- वर प्रतिपक्षाविरुद्ध तक्रार करणे योग्य नव्हे, हे जाणूनच चुनीलाल वागत होते; परंतु मुंबईतल्या त्यांच्या कांहीं हितशत्रूंनी स्वदेशी बँकांच्या धांदलीची संधि साधून जेव्हां स्पीशी बकेवरच गदा आणली आणि एका महिन्यांत सवा कोटि रुपये परत करणे भाग पाडलें त्या वेळी मात्र शेठजींचा पुरा कोंडमारा झाला. बँके- वरील आघात त्यांनी शौर्याने चुकविलाच; परंतु त्याबरोबरच 'धर्मयुद्ध नव्हे हे' अशी त्यांची खात्री होऊन हार पत्करून त्यांनी लंडनमत्रील चांदी विकून टाक- ण्याचे ठरविले असावें. त्यांचे प्रतिस्पर्धी ज्या संधीची चातकाप्रमाणे वाट पाहात होते तीच लांस मिळाली; आणि बेसुमार उतरविलेल्या भावाने ( २६ पेन्स) साडेचार कोटींची चांदी माँटेग प्रभृति कंपन्यांनींच खरेदी केली ! ही खरेदी होण्याबर आतां भाव २८ पेन्सपर्यंत पुनः चढले आहेत, आणि सरकारद्दि आतां चांदी खरेदी करणार असून मॉटेग प्रभृति कंपन्यांना ह्या सहयांत चांगलाच नफा होण्याची आशा आहे, अशा तारा येऊं लागल्या आहेत; आणि त्यांत आश्चर्य तें काय ! सर्वतोपरी अनुकूल परिस्थिति आणि सरकारचें पाठ- बळ ह्यांच्या जोरावर लंडनमधील चांदीच्या व्यापाऱ्यांनी सर्व प्रकारें कोंडींत सांपडलेल्या निःशस्त्र वीरावर जय मिळविला ह्यांत फुशारकी ती कोणती ? परंतु दुःखाची गोष्ट हींच कीं, अभिमन्यु शरसंधान करीत असतां पलायन करणाऱ्या जयद्रथाने ज्याप्रमाणे तो निपचित पडल्यावर परत येऊन त्याच्यावर लत्ताप्रहार केला, त्याचप्रमाणे चुनीलालच्या पश्चात् त्यांच्यावर हल्ला करण्यास कांहीं जयद्रथी