पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०८ श्री. ज. स. करंदीकर यांच निवडक लेख व निबंध ह्यांची दावेदारी स्वाभाविकच ठरते. अर्थात् चुनीलाल यांच्या नांवाने ह्या निंदकांनी खडे फोडण्यास शेटजींची कर्तबगारी सरकारला कोठें नई लागली होती. हे पाहिले पाहिजे. सरकारची चांदी-खरेदी व चढता भाव इ. स. १९०७ साली स्पीशी बँकेची स्थापना झाल्यापासून चुनीलाल यांनी चांदीच्या व्यापारांत मन घातले. तोपर्यंत हा व्यापार बहुतेक युरो कंपन्यांच्याच मार्फत चाले, आणि टांकसाळीकरितां लागणारी चांदीहि सरकार ह्या कंपन्यांमार्फतच खरेदी करी. इ. स. १९०० ते १९०७ पर्यंतची सरकारची चांदी खरेदी आणि विलायतचा चांदीचा भाव त्यांची तुलना करून पाहिली असतां स्पष्टपणें असें दिसून येतें कीं, ज्या ज्या प्रमाणानें सरकारने अधिक नाणें पाडिलें त्या त्या प्रमाणानेंच चांदीचा भाव चढलेला आहे. १९०१ सालच्या प्रारंभी हा भाव दर औंसास २७ पेन्स होता; परंतु सरकारनें सतरा कोटि रुपये नवे पाडण्याकरितां चांदी खरेदी केली, त्यामुळे हा भाव ३० पेन्सांवर गेला. पुढील दोन साली सरकारनें रुपये पाडणे कमी केले त्या वेळीं तो भाव २२ पेन्सां- पर्यंत उतरला. १९०६ व १९०७ साली सरकारनें वीस कोटींवर रुपये पाडले त्या वेळी हा भाव ३२३ पेन्सपर्यंत चढला; व ही चांदीच्या आजपर्यंतच्या भावाची कमालमर्यादा होय. शेठ चुनीलाल यांनी चांदीच्या व्यापारांत मन घालण्याच्या वेळी बाजाराची अशी स्थिति होती, आणि सरकार युरोपिअन कंपन्यांकडून ३२३ पेन्सच्या कमालीच्या दरानें चांदी खरेदी करीत होतें, आणि युरोपिअन व्यापा-यांस अर्थात् अतोनात नफा होत होता. असला किफायतीचा व्यापार. आपल्या लोकांच्या हातीं यावा अशी इच्छा कोणाहि देशी व्यापायाच्या मनांत येणें वावगें नाहीं. अर्थात् चुनीलाल यांनी आपल्या जोडीला कांहीं व्यापारी घेऊन एक मंडळ स्थापन केलें, आणि चांदीची खरेदीविक्री सुरू केली. युरोपिअन व्यापा-यांच्या हातचा व्यागर जाऊं लागला आणि सरकारलाहि शेठजी सांगतील ती किंमत देऊन चांदी खरेदी करावी लागते की काय अशी धास्ती पडली. यानंतर सरकारने १९०८ ते १९१० पावेतों नवें नागें फारच थोडे पाडिलें. चांदीखरेदी तर अगदींच बंद ठेविली, आणि जुने रुपये आटवूनच काय ते थोडे रुपये पाडण्यांत आल. परंतु आज ना उद्यां नाणें पाडण्याला सरकारला चांदी लागेलच. तेव्हां आपण झालेले नुकसान भरून काहूं ह्या आशेवर चुनीलालांनी चांदीखरेदी चालूच ठेविली. ह्यावर सरकारनें चांदीवर शेंकडा पंधरा टक्के कर बसवून टाकल्यामुळे पूर्वी खरदी केलेल्या चांदीवरहि कर भरावा लागला आणि पुढे ही चांदी हिंदुस्थानात आणून न ठेवितां तिचा सांठा लंडनांत करणें भाग पडलें. परंतु त्यामुळे शेठजींना