पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ जय हातांत पडण्यास किती काळ लागेल तेवढीच गोष्ट अनिश्चित आहे अर्से केस- रीने म्हटले आहे. - १४ युरोपांतलें नवें जिबाल्टर - महायुद्धाचा रंग पालटला आणि दोस्तांना पहिला मोठा विजय प्राप्त झाला, तरी पण इटालींतून आल्प्स पर्वत ओलांडून जर्मनीवर चढाई करणें दुर्घट होते. त्याकरितां दोस्त राष्ट्रांना फ्रान्सच्या किनाऱ्याा- वर सैन्य उतरविणें भाग होतें. फ्रान्सच्या किनाऱ्याच्या बंदोबस्ताकरितां जर्मनीनें पश्चिम किनाऱ्यावर शेरबुर्गचा जंजिरा किल्ला अत्यंत बळकट करून ठेवला होता. त्या जंजिन्यावर अमेरिकन सैन्याने निकराचा मारा करून व पराक्रमाची शर्थ करून अखेरीस तो किल्ला काबीज केला. ब्रिटिशांचें भूमध्य समुद्रांतले जिब्राल्टर हें ठाणे जसे अत्यंत बळकट असून भूमध्य समुद्राच्या रक्षणास तें ब्रिटिशांना उप- योगी पडतें त्याप्रमाणें फ्रेंच किनाऱ्याच्या भावी बंदोबस्तास दोस्तांना शेरबुर्गचें ठाणे उपयोगी पडेल असें जाणून त्या ठाण्याला 'नवें जिब्राल्टर' असे केसरीने म्हटले आहे. १५ पराजयाला हिवाळा आड - मागील १३ व्या लेखांत जें भाकित केलें होतें तें खरें होत चाललेले पाहून, दि. १४ नोव्हेंबरला लिहिलेल्या या लेखांत, केस- रीनें आपले भविष्य अधिक स्पष्ट करण्याचा या लेखांत प्रयत्न केला आहे. दोस्तांची प्रत्यक्ष जर्मनीवर चढाई सुरू होण्याला आतां दुसरी कोणती आडकाठी राहिली नसून हिवाळ्यांतील बर्फाचीच तेवढी अडचण दूर व्हावयाला पाहिजे. उन्हाळा सुरू झाला, बर्फ पार वितळून गेले की, जर्मनीवर चालून जाण्याचा रस्ता मोकळा होईल आणि १९४५ च्या उन्हाळ्यांत युद्धाचा शेवट: होईल हें केसरीचें भविष्य पुढे अक्षरशः खरे ठरले. १६ काळ्या समुद्रांत काळकूट - मागील लेखांत 'पराजयाला हिवाळा आड ' म्हटले होतें. तो हिंवाळा संपत येऊन मार्च महिना जवळ आला. त्या वेळी दोस्त राष्ट्रांचे तिषे श्रेष्ठी कांळ्या समुद्रांतील याल्टा बंदरांत एकत्र जमले आणि त्यांनी जर्मनी व जपान यांच्या संपूर्ण नायनाटाची कांही योजना मुक्रर केली. त्या चोजनेलाच या लेखांत काळकूट म्हटले आहे; कारण ती योजना म्हणजे नाझी जर्मनीचा संपूर्ण निःपातच होय. ही योजना गुप्त असल्याने काळाच्या पोटांतून बाहेर येईपर्यंत तिचा थांग लागणार नाही, या अर्थानेंहि तें काळकूटच आहे. अशा रीतीनें गट्टी राष्ट्रांची गठडी वळण्याची ही योजना अखेरचीच ठरली. कारण या नंतर तीन महिन्यांच्या आंतच महायुद्धाचें अखेरचें पर्व सुरू झालें. १७ महायुद्धाचे अखेरचें पर्व यांत मुसोलिनीचा जो शोचनीय अंत झाला त्यांत इटालियनांनी जो मनाचा हलकट कृतन्नपणा दाखविला त्याचा निषेध आहे आणि हिटलरचा शेवट काय झाला याविषयों कित्येक जण बुचकळ्यांत पडले