पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कली कोंडी पण झाला कोंडमारा २०७ चांदीहि तिकडच्या तिकडेच स्वस्त दरानें विकणे भाग पडलें. अशा अनेक कारणांमुळे चुनीलाल सरैय्या यांना मोठी नुकसानी सोसावी लागली. एवंच, चांदीची कोंडी करण्याच्या खटाटोपांत शेठजींचाच कोंडमारा होऊन स्पीशी बँकेला धक्का बसला व त्या धक्क्यानें स्वतः शेठजीहि प्राणास मुकले. चुनीलाल सरैय्या यांच्यावर हा प्रसंग कसा येऊन आदळला त्याची माहिती या लेखांत दिली आहे. ] मेल्यानंतर शिव्यांची लाखोली मेलेल्या माणसास नांवें ठेवण्यांत मोठासा पुरुषार्थ नाही. 'Never speak ill of the dead' अशी इंग्रजीतहि म्हण आहे. परंतु हल्लींच्या काळांत कित्येकांचें वर्तन मात्र ह्याच्या अगदी उलट होत असते. त्यांच्या वागण्याचें धोरण 'मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या विरुद्ध त्र काढू नको आणि त्याच्या पश्चात् मात्र त्याला यथेच्छ लाखोली वहा' अशा प्रकारचें असतें. शेठ चुनीलाल सरैय्या हे जिवंत असून आपल्यावरील सर्व आरोपांस व आक्षेपांस उत्तर देण्यास खंबीर होते तोपर्यंत त्या 'नृपांगणगतखलां'ची तोंडे शिवल्याप्रमाणे बंद होती; परंतु आता त्यांनी आपल्या जिभा मनमुराद मोकळ्या सोडून 'चुनीलाल वारले हें बरेंच झाले, एक पीडा कायमची गेली' अशाच जवळ जवळ अर्थाचे प्रलाप काढण्यास सुरुवात केली आहे. ॲडव्होकेट ऑफ इंडिया पत्राचे शब्द तर • The man is better (dead' असेच स्पष्ट आहेत ! स्पीशी बँक बुडाली व त्यामुळे ज्यांचें नुकसान झाले त्यांना एखादे वेळी सरैय्याबद्दल संताप येणें मनुष्यधर्मास अनुसरून आहे. परंतु स्पीशी बँकेशी ज्यांचा संबंध विरोधाशिवाय दुसरा कोणताच नव्हता, आणि ती बैंक बंद झाल्यानें ज्यांचें एका काडीइतकेंहि नुकसान झाले नाहीं - उलट फायदाच होण्याचा संभव आहे - अशांनी चुनीलालचे पश्चात् त्यांस शिव्याशाप यावे हे खरोखरीच आश्चर्यकारक व त्वेषजनक आहे. - वरें; या आक्षेपकांचा शेठ चुनीलाल यांच्याशी इतका विरोध तरी कां असावा, आणि त्यांच्या पश्चात् त्यांना 'जुगारी' म्हणून नांव ठेवण्यांत त्यांचा उद्देश तरी. काय असावा त्याची मीमांसा करूं जातां असे दिसतें कीं, चुनीलालचा व त्यांच्या आक्षेपकांचा खासगी द्वेष नव्हता, आणि नसला पाहिजे हें कोणासहि कबूलच आहे. मग शेटजींनी ह्यांचें घोडें तरी काय मारले असा प्रश्न पुढे येणें साहजिकच आहे, व ह्या प्रश्नाचें समर्पक उत्तर 'नृपांगणगतखल' ह्या भर्तृहरीच्या एका शब्दानें देतां येण्यासारखे आहे. अँग्लो-इंडियन पत्रे व त्यांचीच री ओढणारी दुसरीं कांहीं नेटिव्हद्वेष्टीं पत्र त्यांचे एक तत्त्वच ठरून गेलेले असतें कीं, स्वको- यांच्या हितसंबंधास जोपर्यंत बाध येत नाहीं तोंपर्यंत, सरकारच्या प्रत्येक कृत्याची तरफदारीच करावयाची; त्यामुळे त्या तत्त्वाच्या विरुद्ध वागणाऱ्या गृहस्थांशी