पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

oooo ***DO OCKS 0000000000000⁰⁰⁰ आर्थिक व्यवहार 000000000000000000000000000000000 केली कोंडी पण झाला कोंडमारा [ इ.स. १९०७ साल शेठ चुनीलाल सरैय्या या धाडसी व्यापायाने पुढाकार घेऊन स्पीशी बँकेची मुंबईत स्थापना केली. त्या वेळी विलायतेंत चांदी अति स्वस्त असल्यानें हिंदुस्थान सरकारला चांदी खरेदी करून रुपये पाडण्यांत मोठाच फायदा होत असे. तरी पण सरकार लंडनच्या उघड्या बाजा- रांत स्वस्तांत स्वस्त दरानें चांदी खरेदी न करतां, विशिष्ट कंपन्यांमार्फतच चढ्या भावानें चांदी खरेदी करीत असे व त्यामुळे त्या परदेशो कंपन्यांना सर- कारला चांदी चिकण्यांत मोठा नफा पदरात पडत असे. हा नफा आपल्या पदरांत पाडून घेण्याकरितां विलायतेंत मोठ्या प्रमाणांत चांदी खरेदी करून चांदीची कोंडी करावी, आणि हिंदुस्थान सरकारला आपल्याकडूनच चांदी खरेदी करण्याला भाग पाडावें, असा शेठ चुनीलाल सरैय्या यांचा बेत होता. परंतु सरकारने दोन वर्षे चादी खरेदी करणेंच बंद ठेवलें आणि त्यानंतर चांदीवर १५ टक्के आयात कर लादला आणि हा कर बसविण्यापूर्वी विलायतेंतून मुंबईकडे येण्यास निघालेल्या पण मुंबई बंदरांत उतरून न घेतलेल्या चांदीवरगृह तो कर वसूल करण्यात आला. आयात-करामुळे विलायतेंत खरेदी करून ठेवलेली ( केसरी, दि. १६ डिसेंबर १९१३)