पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राबविणार की राबविले जाणार ? आपल्या हिताच्या धोरणाने चालविण्यांत धोका नसून ते यंत्र अलबत्या-गलवत्याच्या हाती दिल्यानेंच अपघात होऊन आपण चिरडले जाण्याचा संभव आहे. राज्यकार- भाराची सूत्रे हाती घेण्यांत राष्ट्रहिताचा घात होणार नसून ती सूत्रे हातची घाल- विण्यांतच मतदारांचा घात होणार आहे. तेव्हां अधिकारसूत्रे हातीं न घेण्याची प्रतिज्ञा करून राज्ययंत्र मोडण्यातोडण्याची वल्गना करणाऱ्या काँग्रेसवाल्या उमेद- •वारांना मतें देऊन मतदारांनी आपल्या पायावर धोंडा पाहून घेऊं नये. काँग्रेसवाले घटना न राबावेतील तर ती घटनाच त्यांना गुलामासारखी राबवील. काँग्रेसवाले राज्ययंत्र मोडण्याच्या हेतूने त्या यंत्रांत हात घालतील तर ते स्वतः त्या पोलादी चोकटीच्या भक्कम यंत्रांत रगडले जातील ! काँग्रेसवाले तटस्थ राहूं म्हणतील तर द्रौग्दीच्या अब्रूचे धिंडवडे न थांबविल्याचा दोष भीष्म-द्रोणादिकांवर आला तसा दोष त्यांच्या कपाळी येऊन त्यांना उघड्या डोळ्यांनी काँग्रेसच्या अब्रचे धिंडवडे काढलेले निमूटपणे पाहावे लागतील ! सारांश, जो जो पेंच कोंग्रेस परकी सरकार- वर टाकूं पाहात आहे तो तो पेच तिच्यावरच उलटणार आहे. असा कटु अनुभव आला म्हणजे काँग्रेसवाल्या कॉन्सिलरांना वर उद्धृत कलेल्या भर्तृहरीच्या वचना- सारखेंच असें म्हणण्याचा प्रसग येईल की, पाशा न छिन्ना रिपवो न भन्ना । आपत्सु मनाः कृषिकास्तु खिन्नाः || शीलं च भ्रष्टं कनकं च नष्टं । श्रेयो न दृष्टं ननु किं नु कष्टं ॥ आंग्ला न त्रस्ता वयमेव त्रस्ताः । सत्ता न ग्रस्ता वयमेव प्रस्ताः ॥ दास्यं न ध्वस्तं वयमेव ध्वस्ताः । परान भ्रान्ता वयमेव भ्रान्ताः ॥ २०५ यास्तव मतदारांनी काँग्रेसवाल्या उमेदवारांना निक्षून असा प्रश्न विचारावा की, नवी राज्यघटना 'गबविणार की तिच्याकडून राबविले जाणार?' ज्याच्या अंगी ती राबविण्याची धमक असेल त्यालाच मत देण्यांत स्वार्थ व परमार्थहि आहे.