पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध मतदारांचें हित पाहाल ना ? ऑरिसांतला प्रश्न तर याच्याहिपेक्षां अधिक सोपा व स्पष्ट आहे. कांग्रेसला निर्धास्त असें बहुमत लाभले आहे. आतां त्या बहुमनाचा फायदा घेऊन काँग्रेसने जर अधिकारस्वीकार केला तर प्रांतिक कारभारापुरतें काँग्रेसचेंच स्वराज्य तेथें स्थापित होत नाहीं काय ? काँग्रेसने मनांत आणल्यास तेथला शेतसारा माफक करणें, जंगलच्या तक्रारी दूर करणे, साक्षरताप्रसार करणे, ग्रामोद्योगाला उत्तेजन देणें, दारूबाजी बंद करण, बेकारीचें निवारण करणे इत्यादि अनेक लोकहिताची कार्ये काँग्रेस करूं शकणार नाही काय ? पण ' दैव देते आणि कर्म नेतें' या म्हणीप्रमाणे कांग्रेसला अवदसा आठवली व तिनें घटना मोडण्याची शपथ घेतली. ही शपथ पाळावयाची म्हटल्यास ओरिसा प्रांतांत काँग्रेसवाल्यांना स्वतः अधिकारस्वीकार करता येणार नाही आणि अल्पसंख्याकांना कॉंग्रेसच्या विरोधा- मुळे अधिकार चालविणे अशक्य होईल. अशा परिस्थितीत इंडिया अॅक्टाच्या ९३ व्या कलमाप्रमाणें ओरिसा प्रांताचा गव्हर्नर अधिकारसूत्रे आपल्या हाती घेअन आपल्या मर्जीतले दोनतीन मंत्री नेमून कारभार चालवील. यांत काँग्रेसने स्वतःची इभ्रत काय राखली आणि मतदारांचें कोणते हित साधले? याचसाठी का मतदारांनी काँग्रेसवाल्यांना मतें देऊन निवडून पाठवावयाचें ? २०४ बंगाल प्रांतांत मुसलमानांचा कारभार त्रासदायक होऊं लागल्यास परि- णामकारक विरोध करावयाचे टाळून आणि ओरिसा प्रांतांत आपल्या हातचा लगान व चाबूक गव्हर्नरच्या हाती देऊन शेतकरी व कामकरी, धनिक व बेकार, सुशिक्षित व अशिक्षित सर्वांनाच त्राहि भगवन् म्हणावें लागण्याइतक्या असहाय स्थितीत लोटून देणें हा विश्वासघात नव्हे काय ? अशा स्थितीत जनतेवर जुलूम झाल्यास ती रुष्ट होऊन क्रांतीचा मार्ग सुलभ होईल अशी क्रांतिवाद्यांची समजूत असल्यास ती साफ चुकीची ठरेल. कारण या जुलमाबद्दल बंगाल्यांतले बहुसंख्य मुसलमान आणि ओरिसांतले गव्हर्नर हे जबाबदार नसून त्यांना निरंकुश करून ठेवणारी काँग्रेसच जबाबदार धरली पाहिजे, हें आतां लहान पोरालाहि कळूं लागले आहे. त्यामुळे मंत्रिपद नाकारल्यानें क्रांतीचा काळ समीप येईल ही आशा व्यर्थ आहे. गुलामगिरी कशांत आहे ? यावरून सर्व समंजस मतदारांच्या ध्यानी येईल की, नवी घटना राबवून घेऊन बहुजनसमाजाचें कल्याण करण्याचा मोका आला असतां कॉग्रेस जर राज्य- नौकेचें सुकाणूं हाती धरून तिला इट वळण देण्याच्या ऐवजी ते सुकाणूं भलत्याच्या छाती देईल, तर ती स्वतःचा घात करून हिंदी रयतेचाहि घात करील. सुकाणूं हाती घेऊन नौका चालविणें ही गुलामगिरी नसून सुकाणूं दुसऱ्याच्या हाती देणें हेच गुलामगिरी ओढवून घेण्याचे दुर्लक्षण आहे. राज्ययंत्रावर नजर ठेवून ते