पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राबविणार कीं राबविले जाणार ? २०३ मोडत नाही. मग बोटाला उगाच शीण कां । खाणावळीतलें जेवण वरच्या 'स्वयंपाका'सारसे तुष्टिकर व पुष्टिकर नसणार हे निश्चित आहे; तथापि खाणावळींत जाण्याचा प्रसंग आल्यावर व तेथें पानावर बसल्यावर मत पान लाथाळण्यापासून व खानावळवाल्याला लाखोली मोजण्यापासून निष्पन्न काय होणार ? खाल्ले तर बाघतें, टाकले तर शापतें, असा पेंच पडल्यावर शापापेक्षां बाधा बरी, कारण ती औषधानें दूर करता येते आणि शाप परतविण्याइतके आत्मबल नाहीं हें असा प्रसंगच आला यावरूनच सिद्ध आहे. एतावता कसाहि विचार केला तरी घटना मोडण्याचा भ्रान्तिष्ट व शक्तिबाह्य उपद्व्यापापेक्षा ती घटना चालवून पाहून तिचे गुणदोष नकी समजून घेण्यांतच कल्याण आहे. भुताला राबवून घेणेंच बरं -प्रांतिक राज्यव्यवस्थेपुरतीच दृष्टि मर्यादित करून प्रांतिक राज्यघटना यंत्राची घडवणूक तपासून पाहिल्यास असे आढळून येते की, हे यंत्र 'तीन राक्ष- सांच्या गोष्टींत 'ल्या राक्षसासारखे आहे. म्हणजे त्या यंत्रांतील सर्व खुब्या ओळ- खून तें कह्यांत वागविल्यास त्याच्यापासून काम घेतां येईल आणि जर को आपल्या अज्ञानामुळे, अनवधानामुळे अथवा असहकारितेमुळे ते आपल्या हातून दुसऱ्याच्या हातीं गेलें, तर तेंहि आपल्याला घातक होईल. भूत स्वाधीन झालेल्या माणसाने त्या मुताला भरपूर काम दिले तर ठीक, नाहीं तर तेंच भूत छातीवर बसून गळा दाबतें. तेव्हां भुताला काम सांगणें बरें का त्याच्याकडे दुर्लक्ष करूने त्याच्याकडून गळचेपी करून घेणें बरें ? या विवेचनांतील मर्म लक्षांत येण्याकरितां उलटसुलट दोन उदाहरणे घेऊं. ओरिसा व बंगाल या दोन प्रांतांतील निवडणुकी आतां पूर्ण झाल्या आहेत. ओरिसा प्रांतांत काँग्रेसवाले बहुसंख्य म्हणजे ६० ते ३७ इतके निवडून आले आहेत. बंगाल प्रांतांत ते २५० ते अवघे ५४ इतके अल्पसंख्य आहेत, तेव्हां बंगालमध्य काँग्रेसवाल्यांनी मंत्रिपद स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही व तेथे ते राज्ययंत्र मोहूंहि शकत नाहींत. बहुसंख्य पक्षांशी वाटल्यास त्यांनी सहकार्य करावें अथवा विरोध करावा किंवा तटस्थ वृत्ति स्वीकारावी; परंतु त्यांची तटस्थ वृत्ति त्यांनाच बाधक होणार. कारण एवढा मोठा अल्पसंख्य पक्ष तटस्थ राहिल्यास संयुक्त मुसलमान पक्षाचा बहुमताला जास्तीच जोर चढेल आणि तो नंगा नाच घालूं लागेल. त्यास असा बेताल वागू देणें कोंग्रेसवाल्यांना इष्ट वाटते काय ? आणि ज्या मतदारांनी काँग्रेसवाल्यांना मतें दिली त्यांना हा नंगा नाच चालं देणे श्रेयस्कर वाटतें काय? अर्थातच ज्यांनी कोंग्रेसवाल्यांना मतें दिलीं से काँग्रेसच्या मोडतोडीच्या व असहकारितेच्या धोरणामुळे पश्चात्ताप पावणार हे उघड आहे. .