पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध प्रश्न हा आहे की, या महापुराने सर्वांनाच गराडा दिला आहे ही वस्तुस्थिति ओळखून या पुराची बाधा न होता त्यांतून आपण शिरसलानत कसे सुद्धं याचा विचार करून तसा प्रयत्न बुद्धिपुरस्सर करणार का हा महापूर आम्ही जाणीत नाही, असल्या घमेंडीत राहून लाटांचे धक्के खात यदृच्छेनें जेथे फेकले जाऊं तेथे मृतवत् पडून राहणार, का महापुराला तुच्छ लेखून त्याच्या उलट पोहण्याची धड- पड करून गटांगळ्या खात बुडून जाणार! पोहण्याच्या कलेतले तज्ज्ञ असे सांगतांत की, पुराचा वेग जबर असल्यास आणि आपली तितकी ताकद नसल्यास पुराच्या उलट दिशेला जाण्याचा प्रयत्न करण हें आत्मघातकीपणाचेंच लक्षण आहे. तेव्हां तो प्रत्यक्ष विरोधाचा मार्ग विचाराच्या कक्षेतून तूर्त सोडून देऊं. दुसरा मार्ग असहकारितेचा. हा महापूर आमच्या इच्छे- विरुद्ध आमच्यावर लोटला आहे, यांतले पाणी गळ आहे, त्यांत कांटेकुटे, साप-विच वाहत येत आहेत. तेव्हां आम्हांस त्याच्याशी बिलकूल कांहीएक कर्तव्य नाहीं, हा महापूर आम्ही अडवून टाकून बंद करूं, नंतर एकत्र जमून ऋग्वेदांतलें सूक्त म्हणून इच्छेनुसार पर्जन्य पाइन स्वच्छ पाण्याचा पूर आणवूं व त्याच्यावर शेती करून समृद्ध होऊं, असे शेखमहंमदी मनोराज्य करता करतांच छोट्यामोठ्या लाटांच्या धक्क्याने वाहवत जाण्यांतच या मार्गाचे पर्यवसान व्हावयाचें. तिसरा मार्ग प्रतियोगी सहकारितेचा असून हाच प्रस्तुतच्या परिस्थितीत कल्याणप्रद होणार आहे. यांत दूरदृष्टीने विचार असा करावयाचा की, नव्या राज्यघटनेच्य रूपाने आपल्यावर लोटलेला हा महापूर आपल्या मागणीहून व कल्पनेहून वेगळ्या व भयानक स्वरूपाचा आहे खरा. पण तो इतक्या वेगानें येऊन धडकला आहे की, त्याला अडविण्याची भाषा बोलण्याची वेळाहे निघून गेली; आतां याच्यांतून आत्म- संरक्षण कसे करावयाचें व ते साधल्यावर 'चोराच्या हातची लंगोटी' या न्यायानें त्यांतूनच शक्य तितका लाभ कसा साधावयाचा याचा विचार करणे प्राप्त आहे. या महापुराचे पाणी कल्पनातीत गढूळ आहे खरें, पण शुद्ध निर्मल पाण्याचा पर आलेला कधीं कोणी कोणत्या तरी देशांत पाहिला आहे काय ? त्यांतून ज्या प्रांतांत तांबडी, पिवळी, काळी अशी त्रिविध रंगांची माती आहे त्या प्रांतांतलें पाणी थोडेबहुत गहूळ असणारच. कालान्तरानें तें निवळेल आणि तोपर्यंत त्यांतली घाण पोटांत न जाईल अशी दक्षता घेतली पाहिजे. महापुराबरोबर कांटेकुटे वाहत येतात पण ते थोडक्याच श्रमानें ढकलून पुराबरोबर घालवून दिले जातात आणि पुरांतले साप विंचू हे स्वतःच इतके गारठलेले असतात की, ते त्या स्थितीत दंश करूं शकत नाहींत. तात्पर्य है की, नवी घटना वाईट आहे याविषयी दुमत नाही, पण ती वाईट आहे अशी रड गाइल्याने व तिच्या नांवाने बोटे मोडल्याने ती घटना कांही