पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राबविणार की राबविले जाणार ? २०१ कौन्सिवाल्या काँग्रेसवाल्यांची अशीच स्थिति होणार आहे. संसारांत तर राहाव- याचें आणि संसारी माणसासारखें न वागतां संन्यासाची व तपश्चर्येची ऐट मिरवा- वयाची अशा माणसाची 'धड ना संसार नि धड ना तप' अशी जशी दुर्दशा होते, तशीच दुर्दशा या कौन्सिलवाल्या कांग्रेसवाल्यांची होणार आहे. हा लांच्या व्यक्तीपुरताच प्रश्न असतां तर आम्हांला त्या वादांत पडण्याचे कारणहि नव्हते; परंतु हजारों मतदारांचे प्रतिनिधि म्हणून त्यांचा कारभार चालविण्यासाठी हे कौन्सिलांत जाणार आणि तेथे गेल्यावर तो कारभार सुव्यवस्थित कसा चालेल याची चिंता न वाहतां घटना मोडण्याच्या भ्रान्तिष्ट कल्पनेच्या नादी लागून लक्षावधि मतदारांच्या संसाराची दुर्दशा करण्याला कारणीभूत होणार; म्हणून मतदारांच्या हिताच्या दृष्टीने त्यांना हा इशारा देणें हें प्राप्त कर्तव्य आहे. नवी राज्यघटना आम्ही राबविणार नाही ही त्यांची कल्पना वस्तुस्थितीला सोडून असून ती अव्यवहार्य व हानिकारक आहे. नदीच्या महापुरांत सांपडलेल्या व त्याबरोबर वाहवटीला लागलेल्या माणसाने मी प्रवाह मानीत नाही अशी ऐट मिर- विण्याइतकेंच हे हास्यास्पद आहे. तुम्ही प्रवाह माना अथवा न माना, प्रवाद तुम्हांला ढकलीत नेत आहे हे निर्विवाद आहे. प्रलक्ष ग्रहण लागण्यापूर्वीच त्याचा वेध •लागतो त्याप्रमाणे नवी राज्यघटना सुरू होण्यापूर्वीच तिचा वेध सुरू झाला आहे, व घटना मोडण्याची घमेंड चाळगणारेहि त्या वेधांत गुरफटलेले आहेत. घटना तुम्ही राबवा अथवा न राबबा, पण घटना तुम्हांला राबवूं लागली आहे हें खास. नव्या कौन्सिलांच्या मतदारांच्या याद्या तयार होजूं घातल्या व त्या वेळेपासून सर्वोसय वेध लागला आणि जेव्हांपासून हे घमेंडानंदन मतदारांच्या घरीं खेटे घालून 'तुम्ही आपले नांव नोंदवून घ्या हो' अशी आर्जवं करूं लागले तेव्हांपासून नवी घटना त्यांना राबवूं लागली हे स्पष्ट सिद्ध झाले. आणि आता तर काय प्रत्यक्ष राष्ट्रसभाध्यक्षापासून तो लुग्यासुंग्या स्वयंसेवकापर्यंत सर्वच काँग्रेसवाले पायास भिंगरी बांधल्याप्रमाणे रात्रंदिवस गांवोगांव, घरोघर भ्रमंती करूं लागले आहेत; तरी पण घटना न मानण्याची भाषा चालच आहे. अहोरात्रीतल्या चोवीस तासांत घटकाभरहि विश्रांति न घेतां संसारांत आकंठ बुडालेल्या माणसान माझा या संसाराशी काडीइतकाहि संबंध नाहीं, मी सर्वथैव अलिप्त आहे, असली वेदान्तां- •तील पोपटपंची तोंडानें चालूच ठेवावी तशांतलाच हा प्रकार आहे. महापुराला अडविण्याची भाषा फुकट महापुराने अकस्मात् एखाद्या गांवाला वेढा दिला म्हणजे अज्ञ व सुज्ञ, बाल व वृद्ध, अशक व सशक्त, आळशी व उद्योगी, वेदान्ती व संसारी सर्वच घेरले जातात, तेव्हां त्याबद्दल कोणास कोणी हसूं नये अथवा हिणवूं नये हेच उचित होय. म्हणून त्याबद्दल आम्ही कोणासहि दोष देत नाही. पण खरा वादाचा