पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

“होती, तरी पण दोस्तांच्या त्या त्याने महायुद्धाचा रंग म्हणतां येण्याजोगे नव्हते. परंतु अमेरिकेचे ८ लक्ष सैन्य किनाऱ्यावर रोमेलच्या पिछाडीला उतरले आणि इजिराच्या बाजूनें ब्रिटिशांनीं चढाई करून रोमेलचा सपशेल पराभव करून टाक व बेंगाझी इत्यादि दुर्घट ठाणींहि हस्तगत केलीं व गह्री राष्ट्रांच्या सैन्याला आफ्रिकन किनाऱ्यावर थारा नाहींसा झाला. त्या वेळी महायुद्धाचें पारडें निश्चितपणें फिरलें असा अभिप्राय केसरीनें या लेखांत दिला आणि तो अभिप्राय यथार्थ ठरला. या वेळेपासून गट्टी राष्ट्रांना एक- सारखी पिछेहाटच करावी लागली. म्हणूनच या लेखाला 'महायुद्धाचा रंग पालटला ' असा सार्थ मथळा देण्यांत आला होता. पालटला असे बिनहरकत आफ्रिकन ११ यांत कोणाचें काय साधलें ? या लेखांत ठुलोन बंदरांतल्या फ्रेंच आरमारी दलानें जी वीरोचित जलसमाधि घेतली तिचें रोमहर्षक वर्णन आहे. दोस्त राष्ट्रांना फ्रेचांचें आरमार हस्तगत करून घेऊन त्याचा जर्मनीविरुद्ध उप- योग करावयाचा होता. व्हिशी सरकारने आपले आरमार आपण होऊन दोस्तांच्या हवाली केलें असतें तर शरणागतीची अट मोडल्याबद्दल जर्मनीकडून व्हिशी सरकारवर ठपका आला असता व संकट ओढवलें असतें. फ्रेंच राष्ट्र पूर्वी आप- लेंच दोस्त होतें, हे लक्षांत घेऊन ब्रिटिशांनी फ्रेंच सरकारला अशा पेंचांत पाडा- वयाला नको होतें. परंतु विजय मिळू लागल्याने दोस्त राष्ट्रांची दृष्टि फिरली आणि त्यांनी फ्रेंच आरमार हस्तगत करण्याचा हट्ट धरला. त्या पेंचप्रसंगांतून सुट. ण्यासाठी फ्रेंच आरमारानें हारीकेरी पत्करली. अर्थातच यांत दोस्तांचा हेतु साधला 'नाही आणि फ्रेंचांनाहि आपले आरमार वाचवितां आलें नाहीं; म्हणूनच केसरीनें ‘ यांत कोणाचें काय साधलें ? ' असा प्रश्न केला आहे. व्यवहारतः त्यांत उभय- तांचेंहि नुकसानच झालें; पण तत्त्वतः दोस्त राष्ट्र तत्त्वच्युत ठरली आणि फ्रेंच आरमारी दलानें वीरोचित जोहार पत्करून अजरामर कीर्ति मिळविली. - १२ दोस्तांचा पहिला खरा विजय - मागील १० व्या लेखांत महायुद्धाचा रंग पालटल्याचें भाकित केलें होतें; त्यानंतर तो रंग पालटल्याचें प्रत्यक्ष दृश्यफल सिसिली बेटाच्या विजयानें दोस्तांच्या पदरांत पडलें. सिसिली बेट हातचें गेल्यानें इटालीवर चढाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि इटालीवर चढाई 'म्हणजे जर्मनीवर घाव घालण्याचा रस्ता मोकळा करणेंच होय. लष्करी- दृष्टया सिसिलीच्या विजयाचें हें महत्त्व ओळखूनच केसरीने या विजयाला 'दोस्तांचा पहिला खरा विजय' असे संबोधिलें आहे. - १३ जय निश्चित काळ अनिश्चित - महायुद्धाचा रंग पालटला आणि सिसिली बेट काबीज करून इटालींतहि दोस्तांची चढाई यशस्वी होत चालली, तेव्हां दोस्त राष्ट्र अखेरी मारणार हे निश्चित झाले असे ठाम विधान करून हा