पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध मुत्सद्दयांना ही चूक उमजून आली आणि आतां सारवासारवी करण्यासाठी व्हाइसरॉयांनी या करारनाम्याबरोबर निजामसाहेबास पाठविलेल्या पत्रांत असे बजाविले आहे की, जर हा करारनामा रद्द झाला तर वन्हऱ्हाडचा राज्यकारभार जसा या करारनाम्यानें चालेल तसाच पुढेहि नवा करारनामा होई- पर्यंत तो चालेल ! पण असेंब्लीतल्या भाषणाने जसा कायद्याच्या कलमांतील. अर्थ बदलत नाही तसाच व्हाइसरॉयांच्या पत्राच्या पुस्तीने करारनाम्यांतले. कलम १७ बदलू शकत नाही. सारांश, हा करारनामा करून घेण्यांत निजाम- साहेबानें ब्रिटिक्ष सरकारास चांगलेच पेंचांत पकडले आहे. वहाडमुळे मध्यप्रांतावर आपत्ति ब्रिटिश सरकार आणि निजाम सरकार यांच्या परस्परांतील संबंधाविषयी येथवर विचार झाला. लाजबरोबर याचा वहाडच्या व मध्यप्रांताच्या जनतेवर काय परिणाम होईल याचाहि विचार करणे प्राप्त आहे. वन्हाडासंबंधाची ही सर्व वाटाघाट चालू असतां सरकारने वहाडच्या लोकांना फुकटच्या एका शब्दानेंहि विचारले. नाहीं ! एवढेच नव्हे तर अखेरपर्यंत काय कारस्थान चालले आहे याची दादहि लागू दिली नाही. यावर सरकार कदाचित् असें म्हणेल की, वन्हाडच्या अंतर्गत कारभारांत या करारामुळे प्रत्यक्षतः फेरबदल कांहींच होणार नसल्याने त्यांचे मत घेण्याची जरूरी भासली नाहीं; पण ही सबब लंगडी आहे. या कराराने टाकोटाक फरक होणारा नसला तरी अप्रत्यक्षपणे परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. वन्हाडच्या प्रतिनिधींना निजामाविषयी राजनिष्ठा पाळण्याची वेगळी शपथ घ्यावी लागेल हे नव्या फेरबदलाचे सूचक आहे व त्यांतहि मोंटा अर्थ भरला आहे. पण मध्यप्रांताच्या गव्हर्नरची नेमणूक करतांना निजामाचा सल्ला घेतला जाणार ही बाब कांहीं अगदीच क्षुल्लक नव्हे. निजामाच्या हितसंबंधाला विरोधी असा कोणीहि इसम यापुढे गव्हर्नर होऊं शकणार नाही. अर्थातच भावी गव्हर्नरानें निजामाची मर्जी अगोदरपासूनच संभाळली पाहिजे असाच याचा अर्थ होत नाही काय ? आणि यापुढें सर अकबर हैदरी किंवा असेंच कोणी निजामाच्या मर्जीतले मुत्सद्दी यांचा डोळा मध्यप्रांताच्या गव्हर्नरच्या जागेवर राहील हे उघड नाही काय ? सर्वात खेदाची गोष्ट ही कीं, वहाड प्रांत निजामाच्या मालकीचा असला तरी मध्य- प्रांत हा कांही निजामाला अंदण दिलेला नाहीं ! मग मध्यप्रांतावर निजामाच्या मर्जीतला गव्हर्नर लादला जावा हा जुलूमच नव्हे काय? हाडसारख्या सुपीक प्रांतांतील वसूल आजपर्यंत मध्यप्रांताचा कारभार चालविण्याला उपयोगी पडला त्याचें हें प्रायश्चित्त की काय ? धडेक्या नावेला फुटकी नाव बांधली म्हणजे दोन्ही बुडतात, त्याचप्रमाणं वहार मध्य-प्रांताच्या गळ्यांत बांधल्यामुळे मध्यप्रांतावर ही आपत्ति ओढवत आहे !