पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सव्याज वचपा काढून घेतला निजामाचे नथ्या हक्काचे परिणाम यापुढे निजामसाहेबांचे दरबार व-हाडांत भरूं लागतील आणि निजामाच्या जन्मदिवश अगर इतर प्रसंगी निजामाकडून पदव्यांची खैरात होईल. या सर्व मान- सन्मानांचा व पदव्यांचा लाभ मुख्यतः कोणाला होणार हे सांगावयास नकोच. नुसत्या पदव्या मिळावयाच्या असला तर ज्याला त्या मिळतील त्याला त्या लखलाभ होवोत असे आम्हीहि म्हटले असते. पण त्या पदव्यांबरोबरच मतदानाचा व कौन्सिलांत निवडून येण्याचादि हक्क मिळणार. अशा पदवीवाल्यांची संख्या फुगूं लागली म्हणजे निवडणुकीवरहि त्यांचा परिणाम होणारच. याशिवाय निजामसाहेबांच्या जुलमा- विरुद्ध गा-हाणे करावयाचे झाल्यास आजवर निजामाच्या हद्दीत उघडपणे बोल- •ण्याला जी बंदी असे ती यापुढे वन्हऱ्हाडांतच नव्हे तर मध्यप्रांतांतहि लागू होऊन अशा गान्हाण्यांची वाच्यता होण्याला अडचण पडेल. कारण निजामसाहेबांचा एजंट आपले हितसंबंध पाहण्याला तेथें डोळ्यांत तेल घालून टपून बसलेला अस णारच. असा एजंट नेमण्याच्या पूर्वी देखील जर निजामाच्या कारभारावर टीका केल्यामुळे 'महाराष्ट्र' पत्रावर घोरपड आली तर एजंटाच्या नेमणुकीनंतर काय प्रकार होईल याचा तर्कच करावा. हल्लीं निजामाच्या प्रजाजनांची संस्थानी परिषद निजामाच्या राज्यांत भरूं शकत नाही, म्हणून ती संस्थानाबाहेर भरविण्यांत येत असते. तशी परिषद वहाडांत तर यापुढे भरूं शकणार नाहींच, पण खुद्द नाग- पुरांत तरी ती भरूं शकेल की नाही याची वानवाच आहे. निजामाने प्यादे मात केली अशा रीतीनें निजामसाहेबाला नुसत्या व-हाडचेंच नव्हे तर मध्यप्रांताचेहि अधिराज्य दिल्यासारखें होत आहे आणि हा असला करार मध्यप्रांत आणि वाड यांतील जनतेची संमति न घेतां किंबहुना त्यांना या कारस्थानाचा सुगा- वाहि लागू न देतां करण्यांत आला. तेंहि एक वेळ असो, पण ब्रिटिश पार्लमेंटला १९३५ सालच्या इंडिया ॲक्टांत दुरुस्ती करावयाची झाली तर त्याबद्दल देखील निजामसाहेबांच्या मर्जीचा ताळमेळ पाहावा लागेल आणि निजामसाहेबांनी एखाद्या कलमाला हरकत घेतली तर तें कलम गाळावें लागेल. ज्याचा इतका दूर- वर परिणाम पोंचूं शकतो असला हा करार ज्यांनी तयार केला त्यांच्या डोळ्यावर कसली धुंदी चढली होती कोणास ठाऊक १ हिंदूंचा नक्षा उतरविण्याकरितां मुसल- नानांना वाटेल त्या सवलती डोळे मिटून द्यावयाच्या या वृत्तीचाच हा परिणाम आहे का अंदरकी बात दुसरीच कांही आहे न कळे. निजामसाहेब व सर अकबर हैदरी यांनी या कारस्थानांत त्रिटिश मुत्सद्द्यांवर प्यादेमात केली यांत मात्र शंका नाहीं.