पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध काढील असें कोणालाहि वाटले नव्हते आणि त्याच दृष्टीनें या विषयावर लिहिणाऱ्या बहुतेक सर्व लेखकांनी त्याची अखेरची बोळवण केली होती. परंतु जगांत चालू असणाऱ्या चक्रनंमिक्रमानें कधी नावेवर गाडा तर कधी गाड्यावर नाव अशी उलटापालट होते. तसाच प्रकार याहि बाबतीत झाला. वन्हाडचा प्रश्न उकरून काहूं नका असे बजावणाऱ्या ब्रिटिश सरकारलाच वम्हाडासंबंधाने आतां काय ते बोला, असें म्हणून निजामाची आर्जव करण्याची पाळी आली. फेडरेशनमध्ये संस्थानिकांना गोवून स्वतःचें आसन बळकट करण्याच्या नादीं नोकरशाही लाग- ल्यानें असें हें गाडे उलटलें. संस्थानिकांच्या संमतीशिवाय त्यांना फेडरेशनमध्ये सामील करून घेतां येत नाहीं, यास्तव संस्थानिकांची मनधरणी अद्यापि चालूच आहे. पण व-हाड हा प्रांत वहिवाटीपुरताच हिंदुस्थान सरकारकडे असल्यामुळे या प्रांताला नवी राज्यघटना लागू करण्य पूर्वी निजामसाहेबांची समति घेतली पाहिजे असा शास्त्रार्थ निघाला आणि ही संमति मिळविण्याच्या वाटाघाटी सुरू होतांच मागील उखाळ्या-पाखाळ्या निघून आपल्या झालेल्या अपमानाचा सव्याज वचपा काढून घेण्याचे निजामसाहेबांनी ठरविलें. वऱ्हाड प्रांत परत मिळविण्याचा प्रयत्न करण्यांत सध्यांच्या निजामाची दृष्टि त्या प्रांताच्या वमुलावर खिळली नसून हा केवळ न्यायाचा व इज्जतीचा प्रश्न होऊन बसला होता. शभर वषापूर्वीची निजा- माची सांपत्तिक स्थिति कशीहि असो, हल्लींच्या निजामसाहेबाजवळ इतकी अलोट संपत्ति सांचलेली आहे की, वन्हाड प्रांतासारखे पांच-पंचवीस प्रांत त्यांस सहज खरेदी करतां येतील. म्हणूनच वऱ्हाड परत मिळविण्याच्या कामी कितीहि पैसा खर्च झाला तरी त्याची खिजगणती नसून, गेल्या दहा वर्षांत या कामी अगणित पैसा बिनदिक्कत खर्च करण्यांत आला आहे. उलटपक्षी वन्हाड हा खूप उत्पन्नाच प्रांत असल्यामुळेच हिंदुस्थान सरकारला तो आपल्या हातून जाऊं द्यावयाचा नाहीं. अर्थातच एका पक्षाची नजर धनावर तर दुसऱ्या पक्षाची मानावर असा योगा- योग असल्यामुळे तडजोड घडून आली. ज्यांत पैशाची घस सोसावी लागेल अशी कोणतीहि अट मान्य करण्याला ब्रिटिश सरकार तयार होणार नाहीं हें ओळखूनच सर अकबर हैदरी यांनी आपली वकिली मोठ्या चातु- र्यानें चालविली आणि मानमरातबाच्या जितक्या गोष्टी साधतां येतील तितक्या साधल्या. मानापेक्षां वनालाच सारसर्वस्व मानणाऱ्या कित्येक टीकाकारांनी निजा- मानें या कोरड्या मानमरातवानें काय मिळविलें, असली अप्रयोजक टीका या करारनाम्यावर केली आहे. पण १८१७ सालापासून १९२६ सालापर्यंत या प्रकर- णांत निजामाला किती तुच्छतेनें वागविण्यांत आले याचा साद्यंत इतिहास ज्याला अवगत आहे त्याला निजामानें आपल्या अपमानाचा सव्याज वचपा काढला अ कवूल करावें लागेल.