पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सव्याज वचपा काढून घेतला पूर्वतिहासाचे स्वरूप वहाडच्या प्रश्नाचा पूर्वेतिहास ब्रिटिशांना किंवा निजामाला कोणालाच अभिमानास्पद वाटण्याजोगा नाहीं. ऋषींचें कूळ आणि नदीचें मूळ शोधूं नये म्हणतात. तसेच या वऱ्हाडच्या वादाचें मूळ शोधण्यांत अर्थ नाहीं. म्हणून १७६६, १७९८ व १८०० या सालांतले व्यवद्दार दृष्टीआड करून १८१७ नंतरचे व्यवहार या गेल्यास त्यांत दोषाचा कांटा कंपनी सरकारकडे अधिकाधिक झुकूं लागतो. ता. २१ मे १८५३ रोजी डलहौसीच्या कारकीर्दीत जो करारनामा झाला च ज्या करारनाम्यामुळे वन्हाडचा मुलूख ब्रिटिशांच्या वहिवाटीखाली पूर्णतः आला, तो करारनामा तर स्वारीचा धाक घालूनच करून घेण्यांत आला होता. या करारनाम्यांतला ढळढळीत अन्याय दूर करण्यासाठी १८६० साली दुसरा करारनामा करण्यांत आला व यांत खर्च वजा जाऊन राहणारी शिल्लक निजामाला परत देण्याचा हक मान्य करण्यांत आला. त्यानंतर सर सालरजंग यांनीं वहाड प्रांत परत मिळविण्यासाठी सनदशीर इलाज चालविला असतां प्रथम १८७५ साली आणि त्यानंतर दिल्ली दरबार होऊन गेल्यावर १८७८ साली स्पष्ट नकार मिळाला. एवढ्यानेंच ब्रिटिश सरकारचें समाधान झाले नाही. वन्हाड परत मागण्याचा प्रश्नच उपस्थित होऊं नये आणि जमाखर्चाच्या हिशेबाचीहि भानगड राहूं नये म्हणून लॉर्ड कर्झन यांनी १९०२ साली ता. ५ नोव्हेंबरला एक नवाच करारनामा करून घेतला. त्यांत वाडची वहिवाट ब्रिटिश सरकारकडे कायमची दिल्याचा स्पष्ट उल्लेख असून, निजामाला २५ लक्ष रुपये नक्त शिल्लक म्हणून दिले जाण्याचा ठराव झाला आणि ज्या हैद्राबाद कॉटिंजंटच्या पोकळ पायावर हा सगळा पोकळ डोलारा उभा केला गेला होता तें हैद्राबाद कॉटिंजंट रद्द करून ब्रिटिश सरकारने आपल्या फौजेपैकी पांच हजारांपर्यंत फौज हैद्राबाद संस्थानांत ठेवावी असें ठरविण्यांत आले. १९५ निजामाला टोमणा लगावला यानंतर हल्लीच्या निजामसाहेबांनी लॉर्ड रीडिंगच्या कारकीर्दीत हा प्रश्न फिरून उपस्थित केला असतां लॉर्ड सॅलिसबरी व लॉर्ड कर्झन यांच्या उत्तराकडे वोट दाखवून 'निर्णीतनिर्णया'च्या सबबीवर आतां याचा विचार करणे देखील अशक्य आहे, असे व्हाइसरॉयांनी खडसावून बजावले. त्याबरोबरच निजामसाहेब हे ब्रिटिशांच्या अधिराज्याखालचे एक संस्थानिक असून त्यांनी ब्रिटिश सरकारशी आपला समान दर्जा असल्याचा टेंभा मिरवावा हे अत्यंत अनुचित होय असाहि टोमणा लगावण्याचें घाष्टर्य त्यांनी केले. १९२६ च्या मार्चअखेर वहाडच्या प्रश्नासंबंधाची स्थिति अशी निराशा- जनक होती. लॉर्ड रीडिंग यांच्या खडखडीत नकारानंतर हा प्रश्न पुनश्च डोके वर