पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध 28300274194 निष्कारण निरुपद्रवी लोकांवर झाला म्हणून त्याचा कोणीहि न्यायप्रिय मनुष्य तीव्र निषेवच करील. पण कराचीचा खवळलेला पिसाट समाज निरुपद्रवी नव्हता म्हणून त्याजवरचा गोळीबार अपरिहार्य होता असेंच कोणीहि न्यायप्रिय व समंजस मनुष्य कबूल करील. सव्याज वचपा काढून घेतला १६ [ निजामाच्या राज्यांतला वन्हऱ्हाड प्रांत हिंदुस्थान सरकारच्या देखरेखीखाली आल्यापासून तो प्रांत परत मिळविण्याचे निजमाचे प्रयत्न चलूंच होते. हा प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी लॉर्ड कर्झन यांनी १९०२ साली एक करार करून वेतला. तो करार बदलून आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी हल्लींच्या निजा- मानें १९२६ साली खडा टाकून पाहिला. पण त्या प्रयत्नानें क र्यभाग न साधतां लॉर्ड रीडिंग यांनी उलट निजामावरच कुर्रघ.डी केली. परंतु नवा इंडिया ॲक्ट करण्याच्या वेळी संस्थानिकांना चढवून ठेवण्याच्या ब्रिटिशांच्या धोरणा- मुळे निजामाला वहाढचा प्रश्न उकरून काढण्याची संधि निळली. त्या वेळी मानासाठी हपापलेला निजाम आणि धनासाठी हरापलेले ब्रिटिश यांच्यांत तड- जोड होऊन वन्हऱ्हाडासंबंधाचा एक नवाच करार करण्यांत आला. त्या करारानें वहाडवरची निजामाची मालकी पक्की झाली व तद्दर्शक अनेक हक्क निजामाला मिळाले. हे नवे हक्क किती दूरगामी परिणाम करणारे आहेत, त्याचें या लेखांत वर्णन असून, असे हक्क मिळविल्य नें निजामानें लॉर्ड रीडिंग यांनी केलेल्या अपमानाचा सव्याज वचपा काढून घेतला, असा निष्कर्ष काढला आहे. विलायतेला जाण्यापूर्वी ता. २७ मार्च १९२६ रोजी त्या वेळचे व्हाइसरॉय लॉर्ड रीडिंग यांनी वऱ्हाडच्या प्रश्नासंबंधांत निजामसाहेबाला जो तुसडेपणाने व तुच्छतेनें ठणठणीत नकार दिला, तेवढ्याने हा प्रश्न कायमचा निकालांत निघाला असें वाटत होतें; पण निजामानें आशा सोडली नव्हती आणि प्रयत्नहि सोडला नव्हता. अर्थातच 'प्रयत्नांती परमेश्वर' ही म्हण खरी ठरली. हिंदी फेडरेशन- मुळे हा प्रश्न पुनरुज्जीवित झाला आणि त्या सुवर्णसंधीचा ब्रिटिशांनी व निजामाने उभयतांनीहि आपआपल्या परीने शक्य तितका फायदा करून घेऊन, आतां हम प्रश्न अगदी निराळ्याच पद्धतीने उभयतांनी सोडविला आहे. ( केसरी, दि. २० नोव्हेंबर १९३६ )