पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कराचीच्या गोळीबाराची मीमांसा रीस निरावार ठरला तरी त्या अधिकाऱ्यांना त्याजबद्दल दोषी ठरवितां येत नाहीं. दंगेखोर व बेताल समाजाला अडवून धरावयाचें झालें तर कोठें अडवावें याचा विचार करूनच लष्करी दृष्टीने अत्यंत सोयीस्कर अशा ठिकाणीच सोल्जरांना उभें करण्यांत अधिकाऱ्यांनी चुकी केली असेंहि म्हणतां येत नाहीं. दोनच गोष्टी अधिकाऱ्यांच्या आंगलट येऊं पाहतात; त्यांतली पहिली बाब अशी की, गोळीबार सुरू करण्यापूर्वी 'आता जमावाची जर पांगापाग न होईल तर गोळीबार सुरू केला जाईल' अशी इशारत देण्याची जी पद्धत आहे तशी इशारत येथे दिली गेली नाहीं. या आक्षेपाला सरकारी उत्तर असे आहे की, सशस्त्र सोल्ज- रांना सगांना खोवून दौडत आगून उभे केले हीच खरी इशारत होय. जेथें कान- ठळ्या बसण्याएवढा गलगा चालू होता व सोल्जरांना सुद्धां वरिष्ठांचे हुकूम ऐकू येण्याची मारामार होती तेथें मॅजिस्ट्रेटनें सूचना दिली असती तरी ती केवळ औपचारिक ठरली असती. परिणामाच्या दृष्टानें बिलकूल फरक पडला नसता. जखमी लोकांत एक बाई असून पांच मुलें प्राणाला मुकलीं व दोन मुलें अत्यवस्थ आहेत, असे या हकीकतींत म्हटले आहे. इतक्या मुलांना गोळ्या लागल्या हीहि बाब सद्दर्शनी सशयास्पद दिसते आणि जेथें गोळीबार झाला तेथल्या रस्त्याची व घरांची पाहणी केल्याखेरीज याचा उलगडा होऊं शकत नाहीं पण तेथल्याच रहिवाशांकडून याचा खुलासा होऊं शकेल. त्याला चौकशीच कशाला हवी ! सारांश, या प्रकरणांत आडदांड, माथेफिरू व कायदा न जुमानणाऱ्या जमावाच्या बेकामपणामुळेच हा रक्तपात झाला असेंच दिसून येत आहे व चौकशी केली असती तरी तेंच सिद्ध झाले असते. चौकशी सुरू केल्यानें जातीजातीतील धुसफूस वाढली असती असे जें निमित्त सरकारने पुढे केले आहे त्यांत मात्र कांही अर्थ नाहीं. अबदुल कायूम फांसावर टांगला गेला तेव्हांच या प्रश्नाचें ज्ञाति- विशिष्ट स्वरूप संपले. हा गोळीबार अपरिहार्य होता आज मुसलमानांवर हा प्रसंग आला म्हणून हिंदु जर बेफिकीर राहतील तर उद्यां हिंदूवरहि असाच प्रसंग आल्यावर कसे होइल, असला जो विक्षिप्त प्रश्न कित्येकाकडून विचारला जातो त्यांतला हेत्वाभास उघड आहे हिंदूंवर संकट ओढवलें असतां मुससमान समाज सहानुभूति दाखविण्यात पुढे आल्याचे उदाहरण आजवर तर दुर्मिळच आहे आणि पुढेंहि कधीं तसे घडेल अशी आशा बाळगावयास नको. तेव्हां ही भीति निराधार आहे. शिवाय मुख्य प्रश्न गोळीबार हिंदूंवर झाला का मुसलमानांवर झाला हा नसून, न्यायाने वागणाऱ्यावर झाला का अन्यायाने वाग णाऱ्यांवर झाला, हा आहे. जालियनवाला बागेतला व सोलापुरांतला गोळीबार