पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध कायदा न जुमानणाऱ्या जमावाच्या बफामपणामुळेच हा रक्तपात झाला " असें म्हटले आहे. आणि हा गोळीबार " जालियनवाला बार्गेतल्या अगर सोला- पुरातल्या गोळीबारासारखा निरुपद्रवी समाजावर झालेला नसून कराचीचा रखवळलेला पिसाट समाज निरुपद्रवी नव्हता म्हणून त्याजवरचा गोळीबार अपरिहार्य होता, असेंच कोणीहि न्यायप्रिय व समंजस मनुष्य कबूल करील असा त्यांतून निष्कर्ष काढला आहे. ] " या गोळीबाराचं इतरांशीं साम्य नाहीं ता. १९ मार्च रोजी खुनी अबदुल कायूम याला कराचीच्या तुरुंगांत फांसावर टांगल्यानंतर बाहेर जो गोळीबाराचा भयंकर प्रकार घडून आला त्यासंबं धानें मुंबई सरकारने पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्या पत्रकाचा जो विस्तृत गोषवारा दुसरीकडे दिला आहे त्यावरून त्या दिवसाची साद्यन्त हकीगत वाचकांस कळून येईल. ही हकीगत वाचली असतां या गोळीबाराचें जालियनवाला बागेतील कत्त- लीशी किंवा सोलापूरच्या गोळीबाराशी बिलकूल सादृश्य नसून आजन्याच्या गोळीबाराशी बरेचसे सादृश्य असल्याचें आढळून येईल. जालियनवाला बागेत जसा अज्ञानामुळे व फसगतीनें जमाव जमला होता तसा तेथे जमला नसून हा जमाव हेतुपुरस्सरच जमला होता आणि अबदुल कायूमचा दफनविधि होऊन गेला असतां हट्टाने त्याचें प्रेत थडग्यांतून बाहेर काढून शहरांत मिरवावयास निघाला होता. सोलापुरास जसें हत्यारबंद लोक मोटारींतून रस्तोरस्ती हिंडले व जो दिसेल त्याजवर गोळी झाडत चालले तसा प्रकार येथे घडला नाही. अर्थातच जालियन- वाला बागेतील निरपराध्यांची कत्तल अथवा सोलापुरांतील बेछूट गोळांबार यांच्यांत आणि कराचीच्या गोळीबारांत कोणत्याच दृष्टीने साम्य नाहीं. अबदुल कायूमचें प्रेत तुरुंगांत पुरलें असते किंवा गुप्तपणे वायव्य सरहद्दीवरील हजारा प्रांतांत पाठविले असतें तरी हा दंगा झालाच असता; मात्र दंग्याची व गोळीबाराची जागा बदलली असती. सोयीस्कर जागींच अडविलें अबदुल कायूमचें प्रेत ज्या स्मशानभूमीत पुरलें तेथेच गोळीबाराचा प्रसंग येऊं नये म्हणून अधिकाऱ्यांनी तेथें लष्करी पाहरा न ठेवतां आडमुठ्या समाजाला तेथे यथेच्छ धुडगूस घालू दिला, हहि एका अर्थाने योग्यच झालें. कारण वाफेला वाट करून दिल्याने तिचा जोर जसा कमी होतो तसाच आडदांड समाजाचाहि जोर मनसोक्त गांधळ घालावयास भरपूर वाव दिल्यामुळे थंडावतो व तसा तो येथेंहि थंडावेल अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा होती. हा त्यांचा अंदाज जरी अखे-