पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कराचीच्या गोळीबाराची मीमांसा १९१ लगामाचें बेफाम त लोकमतरूपी लगामाच्या नियंत्रणाखाली जितकें लवकर आणतां येईल तितकें लवकर आणणें हें आपले कर्तव्य आहे आणि त्याकरितां लोकमत अत्यंत प्रभावी केले पाहिजे, असाच बोध या दुःखपर्यवसायी प्रकरणा- पासून जनता घेईल, असा आम्हांस भरंवसा वाटतो. कराचीच्या गोळीबाराची मीमांसा [ सिंध प्रांतांतील कोर्टात नथुराम नांवाच्या एका हिंदु लेखकावर खटला चालला असतां त्यांतून तो निर्दोषी ठरून सुटला म्हणून चिडून जाऊन अबदुल कायूम नांवाच्या एका इसमानें भर कोर्टातच त्याचा खून केला. या खुनाबद्दल अबदुल कायूमवर रीतसर काम चालून त्यास फांशीची शिक्षा सुनावण्यांत आली आणि दि. १९ मार्च १९३५ या दिवशीं अबदूल कायूम •यास कराचीच्या तुरुंगांत फांसावर टांगलें. त्यानंतर त्याच्या प्रेताचा दफनविधि शहराबाहेरील दफनभूमींत झाला. मागाहून त्या ठिकाणीं मुसलमानांचा प्रचंड जनसमूह जमून त्या जमावानें अबदुल कायूमचें पुरलेलें शव उकरून बाहेर काढलें आणि ते प्रेत मिरवत मिरवत कराची शहरांत आणण्याचा त्यांचा विचार होता. ही मिरवणूक कराची शहरांत शिरली असती तर कराची शहरांत दंगा-मारामारी, जाळपोळ व खून इत्यादि अत्याचार होण्याचा दाट संभव असल्यानें अधिकाऱ्यांनी मिरवणुकीला बंदी केली आणि शहराची वाट अड- विण्याकरितां पोलीस उभे केले. त्या पोलिसांस दाद न देतां दंगेखोर पुढे घुसूं लागलेले पाहतांच लष्कराची मदत मागविण्यांत आलो. लष्करालाहि न जुमानतां हा जमाव लष्करी शिपायांच्या अंगावर चालून येऊं लागला, तेव्हां गोळीबाराचा हुकूम देण्यांत आला. त्या गोळीचारांत ४७ इसम मृत्युमुखीं पडले व १३४ जखमी झाले, तेव्हां जमाव पांगला आणि शांतता प्रस्थापित झाली. त्यानंतर मुसलमानांनीं या गोळीबाराविरुद्ध गवगवा करून त्याची चौकशी करण्याची मागणी केली. त्या मागणीला सरकारने नकार देऊन गोळी- बार कां करावा लागला याचा खुलासा करणारें पत्रक प्रसिद्ध केलें. त्या पत्रकाला अनुलक्षून प्रस्तुतचा लेख आहे. या लेखांत " आडदांड, माथोफरू व ( केसरी, दि. १२ एप्रिल १९३५ )