पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० नीच्या बाजूनें युद्धांत सामील झाल्यानें महायुद्धाचा वणवा युरोप खंडाच्या बाहेर कसा भडकला याचा तपशील वर्णिला आहे. ५ फ्रान्सच्या शरणागतीची मीमांसा या पांचव्या लेखांत फ्रान्स देश. शस्त्र खाली ठेवून जर्मनीला सर्वतोंपरी शरण गेला त्याचें कारण काय, फ्रेंच राष्ट्र असें दुबळें कशाने झालें, त्या राष्ट्राची अशी दुर्बलावस्था होण्याला फ्रेंच लोकांच्या विचार- सरणीतले आणि राहणींतले कोणते दोष कारणीभूत झाले याची मीमांसा. केली आहे. ६ रशियांतील रणसंग्रामाचा आढावा या सहाव्या लेखांत जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारून त्या देशावर जी चढाई केली, त्या चढाईत तीन महि न्यांत केवढा विक्रम केला त्याचें वर्णन आले असून, त्यापुढे लढाईला कसें नवें वळण -लागेल याचे दिग्दर्शन केले आहे. ७ जपानी चढाईचा परिणाम महायुद्धाला अगदी निराळें वळण लाव- ण्याला जपानची युद्धघोषणाच कारणीभूत झाली, जपान देश युद्धांत सामील झाल्यानें हिंदुस्थानचा महायुद्धांत साक्षात् संबंध आला. अर्थातच जपानच्या चढाई- मुळे जर्मन महायुद्धावर कोणते परिणाम घडणार, या विचारापेक्षां हिंदुस्थानांतील राजकारणावर त्याचे परिणाम काय काय होतील याची भवति न भवति या लेखांत केली आहे. 4 सिंगापूर पडलें, आतां तरी कर्तव्यमार्गाला लागा या आठव्या लेखांत जपानच्या चढाईचा धोका कसा आहे, त्याचें तर दिग्दर्शन आहेच पण जपानच्या मुसंडीला तोंड द्यावयाचें असेल तर हिंदुस्थान देश संतुष्ट राखण्या- करितां या देशाला स्वराज्याचे हक्क देणे आवश्यक असून, ब्रिटिश सरकारने तें कर्तव्य बजावण्याच्या मार्गाला लागावें असा इशारा या लेखांत दिला आहे. ९ ब्रह्मदेश गेला आतां आसाम तरी सांभाळा हा नववा लेख मागील लेखाच्या अनुषंगानेंच पुढे आला. सिंगापूर पडल्यावर ब्रह्मदेश वाचणें दुर्घट आहे हैं दिसतच होतें व तेंच अखेर प्रत्ययास आले; परंतु ब्रिटिश सरकारचें धोरण सुधारलें नाहीं. हिंदुस्थानला स्वराज्य देऊन युद्धार्थ सुसज्ज करण्याची दूरदृष्टि ब्रिटिश मुत्सद्दयांना अद्यापि पटली नाही, हे पाहून यापुढे आसाम प्रांतावर संकट येणार, तो प्रांत तरी सांभाळा, अशी धोक्याची सूचना या लेखांत दिली आहे. १० महायुद्धाचा रंग पालटला - महायुद्ध सुरू होऊन तीन वर्षे होऊन गेली. दरम्यानच्या काळांत दोस्त राष्ट्रांना कांहीं जय मिळाले नव्हते असें नाहीं.. स्टॅलिनग्राड हस्तगत करण्याच्या भरीला पडून जर्मन सैन्यावर शरणागतीचाहि प्रसंग आला होता. इकडे जपानचाहि आरमारी युद्धांत पराजय होतच होता. आफ्रिकन किनाऱ्यावरहि एकदां जर्मन सैन्याला मोठी माघार घ्यावी लागली