पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध अनत्याचार बरा का अत्याचार बरा ? म्हणूनच नोकरशाहीला गांधींचा असा गर्भित पण अर्थपूर्ण सवाल आहे की, तुम्ही अनत्याचारी सत्याग्रही लोकांशी तडजोड करून स्वराज्य देणार कां, या चळवळीचे अत्याचारांत रूपांतर झाल्यावर मुठींत नाक धरून आयर्लंडांतल्या सिन- फेनवाल्यांप्रमाणे अत्याचारी सत्याग्रयांशी तडजोड करून त्यांना स्वराज्य देणार! एवीतेवी तुमच्या हातची सत्ता जावयाची कांही टळत नाहीं. मग जगाच्या इतिहासांत अनत्याचार यशस्वी होतो, असे नमूद होणे श्रेयस्कर का अत्या- चारच यशस्वी होतो असे नमूद होणे श्रेयस्कर ! आयर्लंडानें अत्याचार केले तेव्हांच त्यास इंग्लंडन स्वराज्य दिलें हा ऐतिहासिक दाखला संसर्गजन्य रोगासारखा आहे. पारतंत्र्यांत पिचणाऱ्या राष्ट्रांना पछाडणारे ते एक अनिष्ट उदा- हरण होऊन बसले आहे. आणि हिंदुस्थानांतहि अनत्याचारी सत्याग्रहाची तशीच अपेशी अखेर झाली तर जगांत अत्याचारी पाशवी शक्ति हीच स्वातंत्र्येच्छु राष्ट्राची अधिदेवता होऊन बसेल. तिकडे खुद्द इंग्लंडमध्येच राष्ट्राराष्ट्रांत सलोखा घडवून, आरमारें कमी करून, रणदेवतेला आणि तिची उपासना करणाऱ्या उपास- कांना कायमची रजा देण्याचा विचार चालला आहे. आणि इकडे जगाला अनत्या- चाराचा धडा शिकविण्याकरितां आपलें बलिदान करण्यास तयार झालेल्या महात्मा- जींच्या, अंतःकरणाला पीळ पाडणाऱ्या पत्राची येथील नोकरशाहीकडून केवळ थट्टा केली जात आहे. म्हणूनच अशा नोकरशाहीच्या या उर्मटपणाबद्दल तिला जबाब विचारण्याकरितां म. गांधी हे उदयीक आपल्या मोहिमेवर निघणार आहेत. त्यांच्या या मोहिमेंत त्यांना यशःप्राप्ति व्हावी म्हणून आपल्या हातून ज्या ज्या मार्गानें त्या चळवळीस मदत होईल त्या त्या मार्गाने मदत करणे आणि अनत्या- चारी सत्याग्रही लोकांशी सरकारहि तशाच अनत्याचारी वृत्तीनें न वागेल तर त्या- बद्दल सरकारला जाब विचारणें, हेंच या वेळी प्रत्येक हिंदवासीयाचें कर्तव्य आहे.. बेजबाबदार नोकरशाही व दुबळें लोकमत [ इ. स. १९३० च्या मार्च महिन्यांत हिंदुस्थानांत कायदेभंगाची लाट उसळली होती. त्या वेळी कायदेभंग करण्याच्या अनेक प्रकारांत ताडीचीं झाडें तोडण्याचा सपाटा सुरू झाला होता. त्या वेळीं सोलापूर शहरांतून एक मोठा जमाव ताडी तोडण्याकरितां निघाला असतां त्यास तेथील अधिकारी व ( केसरी, दि. १३ जानेवारी १९३१ )