पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सत्याग्रहाच्या युद्धाचा रणदुंदुभि वाजूं लागला १८५ व ते आपल्या पाठोपाठ सत्याग्रहाला तयार होऊन सरकारला जिकीरीस आणून सोडतील. असल्या कायदेभंगाचा विजय हा संख्याबलावरच अवलंबून असल्यानें ज्या वेळी कायदेभंग करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस पुरे पडणार नाहींत, त्यांच्यावरचे खटले चालवितां चालवितां मॅजिस्ट्रेट मेटाकुटीस येतील आणि ज्या वेळी एवढ्या प्रचंड सत्याग्रही सेनासागराला कोंडून ठेवण्याला देशांतले सगळे तुरुंगहि अपुरे ठरतील, त्या वेळींच सरकार वठणीला येईल. पण न जाणो, यदाकदाचित, अशा तत्त्वनिष्ट अनत्याचारी अनुयायांची संख्या सरकार रडकुंडीस येईल एवढी असंख्य भरणार नाही अशी ओझरती शंका येथूनच की काय, गांधीजींनी आपल्या त्या पत्रांत दुसरा एक गर्भित इशारा सरकारला देऊन ठेवला आहे. गांधीजी लिहितात की, “मी व माझे एक- निष्ठ अनुयायी हे तर प्राण गेला तरी छळ करणान्याविरुद्ध हात उचलणार नाहींच हें निस्संशय खरें आहे. पण देशांतल्या ३२ कोटि लोकांची हमी कोण घेभुं शकेल ? " असली अमर्यादित जबाबदारी आपणावर पडूं नये म्हणूनच तर गांधींनी या सत्याग्रहाचें सर्व नेतृत्व काँग्रेसकडून काढून स्वतःकडे घेतले आहे आणि आपल्या हाताखालच्या खास तुकडींत ते आपल्या खात्रीच्या इसमा- शिवाय इतर कोणाचाहि समावेश करून घेण्यास तयार नाहीत. कित्येकांनी तशी तीव्र इच्छा प्रकट केली असतां व त्यांच्या लायकीविषयी शंका घेण्यासहि जागा नसतां गाधींनीं त्यांस आपल्या तुकडींत दाखल होण्यास परवानगी दिली नाहीं, यावरून ते स्वतः आपलें अनत्याचाराचें तत्त्व अक्षरश: पाळले जावे याविषयों केवढी दक्षता बाळगीत आहेत तें दिसून येतें. तरी पण केवळ कर्तव्य म्हणून नोकरशाहीला ते एक प्रकारें असा गर्भित इशारा देऊन ठेवीत आहेत कीं, या सविनय कायदेभंगाचें रूपांतर कालांतराने अविनय कायदेभंगांत होणारच नाहीं, अशी हमी कोण घेऊं शकेल ? मी तुरुंगांत गेल्यानंतर तसला कांहीं प्रकार घडल्यास त्याबद्दल मी जबाबदार नाहीं. तथापि तीहि शक्यता लक्षांत घेऊन सरकारने या शिष्टाईचा विचार करावा. परंतु सरकार इतकें घमेंडखोर आहे कीं, गांधीजींचा हाहि इशारा त्यांस कस्पटासमान वाटत असावा आणि म्हणूनच त्यांच्या शिष्टाईस त्यांनी अशा वाटाण्याच्या अक्षता लावल्या असाव्या. परंतु घमेंडखोरांची घमेंड उतरण्याचा अखेरीस केव्हांना केव्हां तरी आणि कोणत्याना कोणत्या तरी मार्गानें प्रसंग येतोच. रावणानें आपल्याला देव अगर दानव यांपासून मृत्यु येऊं नये अशी खबरदारी घेतली. तरी त्याचा नाश नर आणि वानर यांच्या हातून झाला; हिरण्यकश्यपूनें आपल्याला दिवसा अगर रात्री या दोहोंतून केव्हांहि मरण येऊं नये म्हणून वर संपादन केला, तरी त्याचा नाश संधिकालांत झालाच; तो कांहीं कायमचा टळला नाहीं,