पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध कडे होऊ लागली आहे व गांधींनी ती व्हाइसरॉयांना लिहिलेल्या पत्रांत नमूद केल्यामुळे तिच्यावर वज्रलेपाप्रमाणे शिक्कामोर्तब झाले आहे. माबाप सरकार दुस्मन वाटू लागले पूर्वी जो वर मानला जात होता तो आज शाप मानला जाऊं लागला एवढा ब्रिटिश राज्यनीतीचा अधःपात कशामुळे झाला ? व तो अधःपात थांबवून आपल्या राज्यधोरणाला लागलेला हा कलंक कसा धुवून काढावा याचा शांत डोक्यानें विचार करणे हें व्हाइसरॉयांचे कर्तव्य नाहीं काय ? आणि हें कर्तव्य प्रामाणिकपणे बजावा असेच महात्माजींचा खलिता व्हाइसरॉयांना उघड बजावीत नाहीं काय ! पण या इशाऱ्याकडे त्यांचें लक्ष तरी गेलें काय ! चुकीनें असो, भ्रांतीनें असो, कसेंहि असो, जे भोळेभाबडे भरतवासी लोक सरकारला 'माबाप' समजत होते तेच लोक आतां त्याच सरकारला दुस्मानासारखे लेखू लागले आहेत. एवढी ही विचारक्रांति घडण्यासारखे पाप राज्यकर्त्यांच्या हातून कोणतें घडलें ! आणि तं पाप यापुढे तरी कसें टाळावे आणि त्या पापक्षालनार्थ कोणतें प्रायश्चित्त घेऊन जन- तेची मनें पुनः आकर्षून घ्यावीत याचा निदान स्वार्थैक दृष्टीने तरी व्हाइसरॉयांनी विचार करावयास नको होता काय ? पण तसा जर विचार नोकरशाहीकडून होईल तर व्यास महर्षीनी धृतराष्ट्र दुर्योधनादिकांचे आणि वाल्मीकि महर्षीनी, रावण-कुंभ- कर्णादिकांचे शब्दचित्र मनुष्यस्वभावाला अनुसरून रेखाटले नसून केवळ स्व- कपोलकल्पनेने आणि अनैसर्गिक असंच रेखाटले आहे असा आक्षेप त्या महर्षीवर भाला असता ! पण व्यास-वाल्मीकादिकांची मनुष्यस्वभावाची पारख अगदी बरोबर आहे हें ब्रिटिश नोकरशाही आपल्या चुकांचें परिमार्जन न करता त्यांचें दृढीकरण करून आज सिद्ध करीत आहे. सरकार वठणीला केव्हां येईल ? गांधीजींच्या लेखांतला जो एक इशारा नोकरशाहीला अनुलक्षून आहे, त्याच्याकडे तिनें सर्वतोपरी दुर्लक्ष केले आहे, हें व्हाइसरॉयांच्या धिक्कारगर्भ आणि अल्पाक्षर पण बव्हर्थसूचक अशा उत्तरावरून सिद्ध होतच आहे. परंतु गांधींच्या पत्रांतला जो दुसरा इशारा जनतेला अनुलक्षून आहे त्याच्याकडे जनताहि असेंच दुर्लक्ष करणार काय ! अनत्याचाराचें बळ सर्वस्व आत्मिक सामर्थ्यावर अवलंबून असते आणि ते आत्मिक सामर्थ्य प्रकट होण्याचा एक मार्ग म्हणजे तत्कायैकनिष्ठ अशा अनुयायांचा अखंड ओघ चालू राहणे हा होय. सत्याग्रहाचा विजय होण्याला सत्याग्रह पक्ष हाच बहुजनसंमत आणि बलिष्ट व तद्विरोधक नोकरशाहीचा पक्ष अल्प- संख्य व कमकुवत आहे, असे स्पष्टपणे जगाच्या निदर्शनास आले पाहिजे. गांधींनी जो हा शेवटचा शिष्टाईचा खलिता व्हाइसरॉयांकडे रवाना केला तो याच कल्पनेने केला असावा की, सविनय कायदेभंगाचें तत्त्व लक्षावधि काँग्रेसभक्तांना पटले आहे