पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सत्याग्रहाच्या युद्धाचा रणदुंदुभि वाजूं लागला १८३ तुरुंगवासाची ही बातमी कळतांच त्यांनी आपले प्रस्तान दोन दिवस आगाऊच ठेवण्याचा विचार चालविला होता. पण अखेरीस पूर्वीचाच मुहूर्त कायम करण्यांत आला व त्यास अनुसरून उदयीक म्हणजे बुधवार ता. १२ रोजी सकाळी ६ वाजतां गांधीजी आपल्या ६०-७० अनुयायांसह सविनय कायदेभंगाच्या मोहिमेवर निघतील. म. गांधींच्या खलित्याची वासलात कशी लागली ? या मोहिमेवर निघण्याचें निश्चित करण्यापूर्वी म. गांधींनी शेवटचा शिष्टाईचा प्रयत्न म्हणून जो व्हाइसरॉयकडे एक खलिता पाठविला त्याचा व्हाइसरॉयच्या मनावर लवलेशहि परिणाम झाला नाहीं असे दिसतें. कारण त्या खलित्याला त्यांनी नुसतें चार ओळींचें औपचारिक उत्तर पाठविले आणि त्यांत तरी काय लिहिले तर “कायद्याचे उल्लंघन करणारा व सार्वजनिक शांतता बिघडविणारा मार्ग आक्रमण्याचें तुम्हीं योजिलें आहे याबद्दल व्हाइसरॉयांना वाईट वाटत आहे!" हे वाईट वाटणें केवळ इंग्रजी शिष्टाचाराचें नसून खरें अंतःकरणपूर्वक असतें तर व्हाइसरॉयांनी ही अखेरची शिष्टाई अशी धुडकावून न लावतां गांधींना भेटीस बोलाविलें असतें आणि उभयतांच्या विचारें हा महाभारती लढा थोपविण्याजोगी कांहीं तरी तड- जोड काढली असती. परंतु साम्राज्यमदानें धुंद झालेल्यांच्या डोळ्यांना अखेरीस सूर्यप्रकाशाइतक्या स्पष्ट गोष्टीहि दिसेनातशा होतात आणि कानांना घनगर्जनेसारखे कानठळ्या बसविणारे आवाजहि ऐकू येतनासे होतात. अर्थातच, जणूं काय गांधींच्या खलित्यांत विचार करण्याजोगें कांही नाहींच अशा गुर्मीनें व्हाइसरॉयांनी आपल्या मतानें त्याची वासलात लाविली आहे. पण गांधींच्या या अखेरच्या शिष्टाईत किती खोल अर्थ भरला आहे हे त्यांच्या प्रत्ययास आल्याशिवाय राहणार नाहीं. गांधींचा हा खलिता म्हणजे सरकारला उघड व गर्भित असा दुहेरी इषारा आहे. हिंदुस्थान देशावर ब्रिटिशांनी ही चालविलेली झारशाही या देशाला किती प्रकारांनी घातक झाली आहे याचा जो पाढा गांधींनी वाचला आहे, त्यांतल्या कांही तपशिलाबद्दल कदाचित् कोणी सरकारी आंकडेपंडित नाकं मुरडतील. तथापि धृतराष्ट्रासारख्या एखाद्या जन्मांधालाहि जी गोष्ट ढळढळीतपणें दिसेल अशी जी एक मुद्द्याची गोष्ट त्यांत नमूद आहे तेवढ्याचा तरी व्हाइसरॉयांनी विचार करा- वयाचा होता आणि हे असे झालें कसें व तें कसें सुधारतां येईल, याची वाटाघाट करावयाची होती. हिंदुस्थानवर ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला ही एक 'ईश्वरी कृपा 'च होय. हिंदुस्थानच्या कल्याणासाठी देवानें तो एक या देशाला वरच दिला आहे, अशी समजूत कांही काळापूर्वी बहुतेक सर्व अशिक्षितांची आणि बऱ्याचशा शिक्षितांचीहि होती! ती समजूत आतां पार लयाला जाऊन हिंदुस्थानवर ब्रिटिशांचा अम्मल बसला ' हा एक शापच' आपल्या माथ्यावर बसला अशी भावना अली-