पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध राजन्योपनिमंत्रणाय रसति स्फीतं यशोदुंदुभिः - वेणीसंहार म. गांधींनी संकल्प करून व्हाइसरॉयास पूर्वसूचना दिल्याप्रमाणे सत्याग्रहा- च्या युद्धास बुधवार ता. १२ रोजी प्रारंभ व्हावयाचा आहे. परंतु सरकारासच आतां इतकी घाई झाली आहे की, गांधींजींनी साबरमतीच्या आश्रमांतून बाहेर पडून कायदेभंगास सुरुवात करण्यापूर्वीच सरकारनें सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर झडप घालून त्यांच्यावर मॅजिस्ट्रेटचा हुकूम तोडल्याचा आरोप ठेवला आणि त्यांची खेडा येथें झटपट चौकशी करून त्यांस तीन महिने विश्रांति घेण्यास साबरमतीच्या तुरुंगांत पाठविलें ! वास्तविक पाहतां सरदार वल्लभभाई हे सत्याग्रहा- साठी म्हणून बाहेर पडले नव्हते. गांधींनी या मोहिमेस प्रारंभ केल्यानंतर, त्या झटापटीत त्यांची कारागृहवासांत रवानगी झाल्यावर त्यांची जागा वहभ- भाईनीं स्वीकारावी आणि कायदेभंगाची मोहीम पुढे चालवावी असा संकेत ठरला होता. पण सरकारचा संकेत वेगळाच ठरलेला असल्यामुळे त्या संकेतानुरूप पहिली आहुति गांधींजींची न घेतां वल्लभभाईची घेण्यांत आली. यांत सरकारनें वल्लभ- भाईचा बहुमानच केला आहे, व त्या मानास ते पात्रच आहेत. वल्लभभाईनीं आतां- पर्यंत चार-पांच वेळां सत्याग्रहाची लढत लढविली आहे. आणि प्रत्येक मोहि- मेंत विजयश्रीनें त्यांच्या गळ्यांत माळ घातली आहे. असा विजयी सरदार कायदे- भंग करून सरकारच्या कायद्याच्या जाळ्यांत आपण होऊनच अडकून पडेपर्यंत धीर न धरतां नोकरशाहीनें आपल्या कायद्यांचं जाळे मुद्दाम त्यांजवर टाकून त्यांस पकडलें, यावरूनच म. गांधीपेक्षां सरकार सरदार वल्लभभाईना अधिक भिते असे सिद्ध होत आहे. कारण सरकारला पक्के ठाऊक आहे कीं, सुरत जिल्ह्यांतील ज्या भागांत गांधी हे सत्याग्रहाकरितां तळ देऊन राहणार या भागांतल्या सत्याग्रही स्वयंसेवकांची संघटना वल्लभभाई पटेल यांनींच चालविली असून त्यांनी निर्माण केलेली संघशक्ति सरकारला अनावर होईल. यास्तव वहभभाईनी निर्माण केलेली शक्ति गांधीजींच्या हातून सरकारच्या छातीवर येऊन आदळण्यापूर्वीच तिला प्रति-- बंध करावा या हेतूने सरकारने आपल्या मतें वल्लभभाईचाच कांटा आधी काढून टाकला ! अशा हातचलाखीने आपण गांधींचा सगळा व्यूह ढांसळून टाकून तो निष्फळ करूं अशी सरकारची समजूत असल्यास ती सर्वथैव चुकीची आहे. कारण आतां सत्याग्रहांचें बीं सर्वत्र व इतकें खोल रुजलें आहे की, वल्लभभाई आधीं कारागृहांत गेले काय अथवा गांधीजी कारागृहांत गेले काय, त्या योगानें सत्या- ग्रहाची लढत चालविण्याच्या योजनेत कांहींच तफावत पडणार नाहीं. जर कांहीं फरक झालाच तर वल्लभभाईना अशा रीतीने आगाऊ अचानक पकडल्यामुळे सत्याग्रहाची तीव्रता मात्र अधिक वाढेल. अर्थातच गांधींना देखील वल्लभभाईच्या