पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सत्याग्रहाच्या युद्धाचा रणदुंदुभि बाजूं लागला तीचा आहे तो दोष जसा एके ठिकाणी उमटला तसाच तो अन्य ठिकाणी उमट- लाच असला पाहिजे. >> अशा परिस्थितीत " जेवढी उघडकीस आली तेवढी चोरी आणि जेवढी पचली तेवढी सावकारी असला आडमुठा न्यायच सरकार पाळणार काय ! सत्याग्रहाच्या जोरावर जो आपली दाद लावून घेईल त्याचा तेवढा न्याय करूं असे म्हटल्यानें 'बळी तो कानपिळी' या तत्त्वाला उत्तेजन दिल्यासारखें होत नाही काय ! आणि जेथला सत्याग्रह अर्धवट स्थितीत बंद पडला आहे किंवा अद्यापि सुरू न झाल्यानें आंतल्या आंत धुमसत राहिला आहे तेथल्या सत्याग्रहास हें एक प्रकारचें आव्हानच नव्हे काय ? अशा रीतीने प्रत्येक ठिकाणी सत्याग्रहाचा कडेलोट होई- पर्यंत ताणून धरल्याने सर्वत्र बजबजपुरी माजणार नाहीं काय ? याकरितां सरकारनें या बाबतीतली धरसोड आतां पुरे करावी आणि लँड रेव्हेन्यू कोडाची लोकमता- नुसार दुरुस्ती करून बार्डोलीपर्यंतच्या जुन्या अन्यायाची परंपरा जेणेकरून बंद पडेल आणि नवीन अन्याय घडण्याला वावच राहणार नाहीं अशी सक्त तजवीज करावी. तसें न घडेल तर ब्रूमफील्ड व मॅक्सवेल यांच्या या रिपोर्टामुळे एका बालीचा लढा मिटविला असला तरी दुसऱ्या अनेक बार्डोल्या निर्माण करणारें असंतोषाचें बी पेरले गेले आहे हे सरकारनें ध्यानांत ठेवावे. सत्याग्रहाच्या युद्धाचा रणदुंदुभि वाजूं लागला १३ [ म. गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह करण्याचे जाहीर करून दि. १२ ला साबरमती आश्रमांतून दांडीकडे कूच करण्याचें योजिलें. अशा रीतीनें सुरू होणारा सत्याग्रह म्हणजे एक प्रकारें अखिल भारतीय लढाच आहे, तेव्हां भारतीय वीरांना या लढ्यांन भाग घेण्याला निमंत्रण करणारा हा रणदुंदुभीच वाजूं लागला आहे, तेव्हां त्या रणदुंदुभीच्या निमंत्रणाला भारतीयांनी मान द्यावा व सत्याग्रहांत शक्य त्या या प्रकारानें भाग घ्यावा, असा या लेखाचा निष्कर्ष असून लेखाचा मथळा व तदनुरूप अवतरण हें 'वेणीसंहार' नाटकांतून घेतलेलें आहे. त्यावरून हा सत्याग्रहाचा लढा किती दूरगामी परिणामकारक होणारा आहे, याविषयींचं लेखकाचें मत या मथळ्यावरूनच व्यक्त होते व त्याचें स्पष्टीकरण या लेखांत आहे. ] ( केसरी, दि. ११ मार्च १९३० )