पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक बार्डोली मिटली, पण इतरांची वाट काय ? १७९ केली की झाला सेटलमेंट रिपोर्ट तयार ! रयतांनी तक्रार केली तर त्यांस उत्तर काय द्यावयाचें तेंहि सरकारच्या दप्तरीं छापून तयार असावयाचें ! असला हा आंधळा कारभार साठ वर्षे चालला आहे; पण आजवर कोठें दाद लागेल तर शपथ ! निराधार विधानें व अनुमानें परंतु अखेरीस सेटलमेंट खात्याच्या पापाचे शंभर घडे भरले आणि त्याच्या डोळ्यांत चरचरीत अंजन घालणारा प्रतिस्पर्धी त्यास भेटला. सरदार वल्लभ- भाईंच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाची मोहीम चालू होतांच सरकारच्या डोळ्या- वरची धुंदी पार उतरली आणि सरकारने डोळे उघडून पाहण्यास प्रथमच सुरुवात केली. अशी सुरुवात करतांच मेसर्स ब्रूमफील्ड व मॅक्सवेल या दोघां सरकारी डोळ्यांना काय दिसलें! मि. अंडरसन व मि. जयकर यांचे रिपोर्ट हातांत घेऊन हे दोन सरकारी डोळे जेव्हां बार्डोलीकडे पाहू लागले तेव्हां बार्डोलीतील वस्तुस्थितीचा व त्या रिपोर्टाचा ताळ ना मेळ ? बार्डोली व चौराशी या तालुक्यांतील अर्धी जमीन खंडानें दिली जाते असे अंडरसन लिहि- "तात. उलट ब्रमफील्ड व मॅक्सवेल म्हणतात की या तालुक्यांतल्या बहुतेक खेड्यांतून खंडाने लागवड करण्याचा व्यवहार क्वचितच होतो आणि ज्या खंड- चिठया म्हणून टेनन्सी रजिस्टरांत नोंदविलेल्या आहेत त्या बिनामी खंडचिठ्या असून खरे व्यवहार निराळेच आहेत. एका खंडकऱ्याने एक भिकार जमीन ५० रु. खंडाने घेतल्याची खंडचिठी अंडरसन यांस आढळली. तेवढ्यावरून साहेबानें सिद्धान्त ठोकून दिला की, या तालुक्यांत जमीनदारांना सरकारी साऱ्याच्या १४ पट खंड कुळाकडून मिळतो ! पण जेव्हां ब्रूमफील्ड व मॅक्सवेल यांनीं यां खंड- चिठीचा छडा लावला तेव्हां त्यांस आढळून आले की, त्या जमिनीत एक विहीर आहे व त्या विहिरीचे पाणी आपल्या कारखान्यांतल्या कामकऱ्यांना मिळावे म्हणून एका पारशी गृहस्थाने ती खंडचिठी लिहून दिली आहे. बार्डोली व चौराशी या तालुक्यांतून रस्त्यांची दुरुस्ती झाली आहे, तेथून तांदूळ व गवत यांची निर्गत फार होते व त्यामुळे शेतकरी गबर झाले आहेत, शेतकऱ्यांच्याजवळ शेतीचीं व दुभती जनावरें वाढली आहेत, तालुक्यांतली लोकसंख्या वाढत आहे इत्यादि जीं कारणें सारावाढीला अनुकूल म्हणून मि. जयकर यांनी नमूद केली होतीं तीं सगळी वस्तुस्थितीस सोडून असल्याचें कमिटीला आढळून आलें. रस्त्यांची दुरुस्ती न होतां उलट रस्ते अधिक खराब झाले आहेत, मोटारींचा सुळसुळाट झाल्यानें गवताला भाव येईनासा झाला आहे, लोकसंख्येची वाढ जननसंख्येच्या मानानें कमीच झालेली आहे, कापसाचा भाव १९१६ ते १९२४ पर्यंत तेजीचा होता खरा, पण अलीकडे तो मंदीचा झाल्यानें रयतांचें उलट नुकसानच होत आहे. तांदुळाचा भाव वाढला आहे खरा, पण