पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध शितावरून भाताची परीक्षा चळवळीच्या मार्गाच्या दृष्टीनें बार्डोलीच्या लढ्यापासून जो हा निष्कर्ष निघाला तो स्वराज्याच्या भावी लढ्यांत उपयोगी पडेलच. पण इतकी व्यापक दृष्टि सोडून केवळ रिव्हिजन सेटलमेंटच्या पद्धतींतील दोषाचें व अन्यायाचें आविष्करण करण्याच्या मर्यादित क्षेत्रापुरतें पाहिलें तरी या सत्याग्रहाने मोठीच कामगिरी केली आहे. मेसर्स ब्रूमफील्ड व मॅक्सवेल यांनी हा रिपोर्ट जरी बार्डोली व चौराशी या दोन तालुक्यांपुरताच लिहिला असला तरी त्यांत त्यांनीं सेटलमेंट ऑफिसरच्या कामाच्या पद्धतीचें आणि सारावाढीच्या तत्त्वांचें जें आविष्करण व विवेचन केलें आहे तें सरकारच्या आजपर्यंतच्या सर्वच रिव्हिजन सेटलमेंटला लागूं होण्याजोगे असल्याने, आजपर्यंत या सेटलमेंट खात्यानें केवढा घोर अन्याय व झारशाही जुलूम चालविला होता याची स्पष्ट कल्पना प्रत्येक वाचकास येते. चौकशी कमिटीनें सेटलमेंट कामगार व कमिशनर यांच्या लीलांचें जें वर्णन या रिपोर्टात केले आहे तें वर्णन व्यक्तिशः मि. जयकर व मि. अंडरसन यांनाच व केवळ बार्डोली तालुक्यापुरतेंच लागू होण्याजोगे आहे असे मानण्याचे कारण नाहीं. शितावरून भाताची परीक्षा होते त्याप्रमाणें बार्डोलीच्या या एका प्रकरणा- वरून सगळ्या सेटलमेंट पद्धतीचेंच अंतरंग उघडकीस आलें आहे. रिव्हिजन सेटलमेंटचा आंधळा कारभार या रिपोर्टानें जगासमोर मांडला आहे. त्यांत मि. जयकर यांच्या हातून घडलेल्या ज्या डझनवारी चुका चवाठ्यावर आल्या आहेत त्या अपवादात्मक आहेत असे मानण्याच कारण नाहीं. बार्डोलीच्या हवेंतच कांही असा वेगळा गुण नाहीं कीं, तेथील सेटलमेंट करतांना सेटलमेंट ऑफिसरचें डोकें ठिकाणावर नसावें. ज्या चुका बार्डोलीच्या तरमबंदीच्या कामांत जयकरांच्या हातून घडल्या तसल्याच चुका दुसऱ्या कामगारांकडून दुसऱ्या तालुक्यांतून घडत आल्या आहेत, हे आम्ही केवळ अनुमानावरून म्हणतों असें नसून त्याला याच रिपोर्टोत भक्कम पुरावा आहे. तो पुरावा असा कीं, मि. जयकर यांनी जी कित्येक चुकीचीं विधाने केली आहेत त्यांतली बरीचशीं विधानें त्यांनी पूर्वीच्या सेटलमेंट रिपोर्टातून जशीचीं तशीं उतरून घेतली आहेत. याचा अर्थ असाच होतो कीं, रिव्हिजन सेटलमेंटच्या कामावर नेमणूक होतांच आपण काय काय करावयाचें याचें चित्र त्या ऑफिसरच्या डोळ्यासमोर तयारच असतें. साऱ्याची वाढ करावयाची हें ध्येय अगाऊच ठरलेलें आणि त्याच्या समर्थनार्थ जी कारणपरंपरा जोडून द्यावयाची तीहि ठरलेलीच ! धार्मिक विधीत ज्याप्रमाणे मंत्र-तंत्र सगळे कांही ठरलेले असतें, फक्त 'मम' म्हणणारा तेवढा बदलत असतो त्याचप्रमाणें सेटलमेंटच्या रिपोर्टातील मंत्र व तंत्र सगळे ठरून गेलें असून फक्त तालुक्याचें नांव व खेड्यांची यादी तेवढी त्या सांच्यांत बसेलशी