पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुसऱ्या महायुद्धाचें बीजारोपण पहिल्या जर्मन महायुद्धांत जर्मनीची आर्थिकदृष्टया पूर्णपणे खच्ची करण्यांत आली. अशा रीतीनें दुर्बळ बनविला गेलेला जर्मनी आपल्या मनांत दंश धरून त्या अपमानाचा सूड उगविण्याच्या संधीची वाटच पाहात होता. दोस्त राष्ट्रांत परस्परांविषयी चुरस नांदत असल्यानें जर्मनीला आपले सामर्थ्य वाढवून युद्धार्थ सुसज्ज होण्याची संधि मिळत गेली. आणि १९२५ च्या मे महिन्यांत पहिल्या महायुद्धांतला रणगाजी जो हिंडेनवर्ग त्याची अध्यक्षपदावर निवड करून जर्मनीने आपल्या पुनरुत्थानाचें प्रत्यंतर युरोपच्या नजरेस आणून दिले. याकरितां प्रस्तुत लेखसंग्रहांतील ' महायुद्ध व परराष्ट्रीय राजकारण ' या विभागाचा प्रारंभ १ जर्मन गरुडाचे तोडलेले पंख पुनश्च फुटले या लेखापासून करण्यांत आला आहे, कारण दुसऱ्या महायुद्धाचे बीजारोपण त्या वेळी झाले. अशा प्रकारें हें बीजारोपण झाले तरी त्या बीजांतून अंकुर बाहेर वडण्याला पुष्कळच अवधि लागला. जर्मन गरुडाला पंख फुटले तरी त्याची भरारी जर्मनीच्या सीमेबाहेर लवकर जाऊं शवली नाहीं. आपले सामर्थ्य वृद्धिंगत करण्यांत आणि महायुद्धासाठी सुसज्ज होण्यांत बारा वर्षे घालविल्यावर हिटलरच्या कर्तृत्वशाली कारकीर्दीत जर्मन गरुडाला आपल्या प्रांताबाहेर आक्रमण करण्याचें अवसान आले आणि जर्मनीनें ऑस्ट्रिया देशावर स्वारी करून तो देश आपल्या पंखाखाली घेतला, ही महत्त्वाची घटना दर्शविण्याकरितां २ जर्मन गरुडाची भरारी हा दुसरा लेख निवडला आहे. महायुद्धाची ही अशी प्रस्तावना झाल्यावर प्रत्यक्ष महायुद्धाला सुरुवात झाल्याचे वृत्त जाहीर करणारा ३ महायुद्धाचा वणवा पेटला हा तिसरा लेख स्वाभाविक क्रमानेच पुढें भाला. त्यानंतर सहा वर्षे सतत चाललेल्या या घनघोर महायुद्धांत अनेक घडामोडी झाल्या. त्या गळ्यांचा परामर्श घेणे शक्य नसल्यानें, ज्या ज्या वेळीं महायुद्धाचा रंग पालटत चालला अथवा त्या युद्धाला वेगळी कलाटणी मिळाली, ते ते क्रान्तिकारक प्रसंग निवडून काढून त्या प्रसंगी लिहिलेले अग्रलेख कालानु- क्रमानें एकापुढे एक देण्यांत आले आहेत. त्या प्रत्येक लेखाचा पूर्वापार संबंध सांगण्याची आवश्यकता नाही. तथापि कोणत्या लेखांत कोणत्या प्रसंगाचें सविस्तर वर्णन आले आहे हे लेखाच्या केवळ मथळ्यावरून वाचकांच्या चटकन लक्षांत येणार नाही. म्हणून त्या त्या लेखांत कोणत्या घडामोडींचा ऊहापोह केला आहे, हें यापुढे थोडक्यांत दिग्दर्शित करण्यांत येत आहे. ४ इटालीनें आगींत तेल ओतलें या चवथ्या लेखांत इटाली देश जर्म-