पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक बार्डोली मिटली, पण इतरांची वाट काय ? जमीन लिलांव बोलणारानें तुम्हांस परत दिली तर ती तुम्ही त्यांच्याकडून घ्या, त्यांत आमचा कांही संबंध नाही, असे जेव्हां सांगण्यांत आले आणि मेणाहून मऊ झालेल्या या अटी देखील जाचक होऊं नयेत म्हणून जेव्हां लिलाव घेणाऱ्याने आपली लिलावाची रक्कम घेऊन सदर जमिनी सोडून द्याव्या, याविषयीं सरकारी ऑफिसरच आपले वजन खर्च करूं लागले त्या वेळी सरदार वल्लभभाई यांनी त्या अटी कबूल करून चौकशी कमिटीला मान्यता दिली आणि मि. ब्रमफील्ड व मि. मॅक्सवेल यांची कमिटी नेमून फेर-चौकशीस प्रारंभ झाला. सत्याग्रहाने किती वाढ रद्द झाली ? या दोघां कामगारांनी जो सविस्तर रिपोर्ट सादर केला आहे त्यावरून बाडोलीच्या रयतांच्या तक्रारी बव्हंशी खऱ्या होत्या आणि रिव्हिजन सेटलमेंटमध्ये ● झालेली सारावाढ चुकीची व अन्यायाची होती हे सिद्ध झाले आहे. सत्याग्रहाच्या पूर्वीच्या सेटलमेंटमध्यें बार्डोली तालुक्याचा सारा १२०१८५ रुपयांनी वाढविण्यांत आला होता. त्यांतली अवधी ६ टक्के म्हणजे ३०८०६ रुपये वाढ कायम ठेवून बाकीची ८९३७९ रुपयांची वाढ रद्द करण्यांत आली आहे. चौराशी तालुक्याचा सारा ६७३०७ रुपये वाढविण्यांत आला होता. त्यांतली अवघी १७८४२ रुपयांची वाढ कायम ठेवून बाकीची ४९४६५ रुपयांची वाढ रद्द करण्यांत आली आहे. एवंच, या चौकशी कमिटीमुळे दोनहि तालुके मिळून १३८८४४ रुपयांची वार्षिक सूट मिळाल्याप्रमाणें झाली. पूर्वीचा आकार कायम राहिला असतां तर पुढील तीस वर्षात एकंदर ४० लक्ष रुपयांचा भरणा हल्लींच्यापेक्षा अधिक करावा लागला असता तो वांचला. अर्थातच बालीच्या सत्याग्रहानें बार्डोली व चौराशी या दोन तालुक्यांतील रयतांचे ४० लक्ष रुपये वांचविले हा प्रत्यक्ष नगदी फायदा झाला. परंतु सत्याग्रहाची किंमत रुपयांच्या मापानें मोजतां येण्याजोगी नाहीं व ती तशी मोजणें म्हणजे आपले अज्ञान प्रकट करण्यासारखे आहे. झारशाहीलाहि खाली पाहावयास लावणारी येथील नोकरशाही जर कशाने नमणार असेल तर ती संघ- टित सत्याग्रहानेंच नमेल हे तत्त्व या बार्डोलीच्या विजयानें अखिल हिंदी प्रजेस जाहीर केलें आहे. वज्राहून कठोर असें नोकरशाहीचे हृदय जहालांच्या टीकेच्या भडिमारानें भंग पावत नाहीं, मवाळांच्या अर्जविनंत्यांनी ते द्रवत नाहीं, आंकडे- पंडितांनी आपले कितीहि पांडित्य प्रकट करून सरकाराच्या चुकीचें पाप त्याच्या पदरांत घातलें तरी तें तिकडे ढुंकून देखील पाहात नाहीं, पण सत्याग्रहाची प्रखर आंच चोहोकडून लागली तर मात्र तें मेणाहून मऊ होतें, हा अनुभव यापूर्वी इतर कित्येक प्रसंगी थोड्याफार प्रमाणांत आलाच आहे; तथापि बोर्डोलीच्या चळवळीने सत्याग्रहाच्या बलाची कसोटी पुरतेपणीं पाहण्यांत आली आणि भावी चळवळीचें तत्त्व म्हणून तें बिनदिकत स्वीकारण्याइतके महत्त्व त्या सत्याग्रहाला प्राप्त झाले.